दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/१०/२०२३

जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात गोवंशीय पाळीव प्राणी गाय, बैल व कालवडीला लंम्पी आजाराची लागण झाली असल्याने या आजाराचे निर्मूलन होईपर्यंत गोवंशीय पशुधनाचे बाजार भरवण्यासाठी बंदी घातली आहे. परंतु या बंदी आदेशाला केराची टोपली दाखवत वरखेडी येथे दर गुरुवारी भरणाऱ्या गुरांच्या आठवडी बाजारात आज मोठ्या प्रमाणात बैल विक्रीसाठी आणण्यात आले आहेत.

याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आम्ही या गावचे नाहीत अशी भूमिका घेतल्यामुळे वरखेडी येथील गुरांच्या आठवडी बाजारात मोठ्या संख्येने बैलांची आवक दिसून आली यामुळे लंम्पी आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

( हा पशुधनाचा बाजार भरवण्यासाठी छुप्या पद्धतीने कोणी सहकार्य केले, अनाधिकृ बैल बाजारात आल्यानंतर कारवाई करण्यासाठी पोलीसांनी का पाचारण करण्यात आले नाही याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.)