वाळू माफियाकडून पत्रकारावर हल्ला; पोलिसात गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०७/२०२२
सोयगाव येथील सकाळ वृत्तपत्राचे निर्भीड पत्रकार ईश्वर गजमल इंगळे हे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वृत्त संकलनासाठी जात असतांनाच वाळू माफिया अमोल हिरे याने रस्त्यावर अडवून तु माझ्या डंपरचे छायाचित्र व चित्रफिती का काढली का काढली (केली) असा प्रश्न विचारत अश्लील भाषेत शिवीगाळ करत चापटा, बुक्क्यांचा मार देत जबर मारहाण करत तु आता पत्रकारिता कशी करतो तेच बघतो असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना आज घडली असून ईश्वर इंगळे यांनी त्यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला व त्यांना अमोल हिरे याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोयगाव पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की सोयगाव येथील अमोल हिरे हा शासनाची रॉयल्टी न भरताच गौण खनिज व वाळू वाहतूकीचा अवैधरित्या व्यवसाय करतो. तसेच याच सोयगाव गावात ईश्वर इंगळे निर्भीड पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत. नियमितपणे पोलीस स्टेशनला जाऊन काही तक्रार किंवा गुन्हा नोद आहे का ? याची माहिती जाणून घेण्यासाठी वृत्त संकलन करण्याच्या हेतूने पोलीस स्टेशनला जात असतांनाच वाळू माफिया अमोल हिरे याने कोणतीही शहानिशा न करता तु माझ्या डंपरचे छायाचित्रण व चित्रफिती तयार केल्याचा आरोप करत थेट रस्त्यावर आढळून चापटा, बुक्क्यांनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडल्याने सोयगाव शहरासह, सोयगाव तालुक्यातील गावागावातून तसेच संभाजीनगर व जळगाव जिल्ह्यातून या घटनेबाबत तिव्र निषेध व्यक्त केला जात असून कायदा सुव्यवस्था जीवंत आहे किंवा नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
—-उद्या पत्रकार संघटनेच्या वतीने निदर्शने—–
वाळू माफियांकडून पत्रकारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सोमवारी दिनांक १८ जूलै सोमवार रोजी सोयगाव तहसील कार्यालयासमोर या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध व हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यासाची मागणी करण्यासाठी निदर्शने करत सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व तालुक्याचे उपविभागीय अधिकारी मा. श्री. विजय मराठे यांना निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती सोयगाव पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी दिली आहे.
———पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा—-
पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिसांनी दखल पात्र गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे.