महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नगराज पाटील.पाचोरा शहराध्यक्ष भुवणेश दुसाणे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०७/२०२२
पाचोरा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जिल्हा ग्रामीण व पाचोरा शहराध्यक्ष पदासाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस, विभागीय व जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले.
खान्देश विभागातून पाचोरा शाखा संघटनेच्या वतीने पत्रकारांना छत्री, रेनकोट वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
यावेळी जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी कुरंगी तालुका पाचोरा येथील लोकमत पत्रकार मा. श्री. नगराज माधवराव पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस मा. श्री. विश्वासराव आरोटे, विभागीय जळगाव जिल्हाध्यक्ष मा. श्री. प्रवीणजी सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष मा. श्री. किशोर रायसाकडा यांनी नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले.
यावेळी पाचोरा शहर संघटनेच्या अध्यक्षपदी पाचोरा येथील दर्शन पोलीस टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी भुवणेश दुसाणे यांची निवड करण्यात आली. या दोघांच्या निवडीबद्दल नितिन पाटील, संदीप महाजन, प्रविण ब्राम्हणे, प्रा सि.एन.चौधरी, अनिल येवले, दिलीप जैन, प्रमोद सोनवणे, महेश कोडीण्य, प्रा. अमोल झेरवाल, विनायक दिवटे, सुनील पाटील, विजय पाटील, मिलिंद सोनवणे, नंदू शेलकर, आत्माराम गायकवाड, प्रशांत येवले, यशवंत पवार, राजेंद्र पाटील, भगवान पाटील, नरसिंग भुरे, प्रमोद बारी आदी पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.