पाचोरा येथे उबाठा सेनेतर्फे खास महिलांसाठी धम्माल मजेदार कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२४
पाचोरा येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी मकर संक्रांतीचे औचित्य साधून खास महिलांसाठी हळदी, कुंकू समारंभ आयोजित केला असून याच दिवशी महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी सायंकाळी पाच ते दहा या वेळेत भडगाव रोड येथील मातोश्री कैलादेवी मंदिरा शेजारील पटांगणावर
महाराष्ट्राभर गाजत असलेला महिला भगिनींचा एकमेव आवडता धम्माल मजेदार कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रम खास सिनेअभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका टि. व्ही. स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात सादर होणार आहे.
या कार्यक्रमात प्रश्नमंजुषा कार्यक्रमाद्वारे महिलांसाठी घरगुती वापराच्या वस्तू व लकी ड्रॉ द्वारे पैठणी देण्यात येणार आहेत. भव्य आकर्षक पाच बक्षिसे ठेवण्यात आलेली असून प्रथम क्रमांकाचे बक्षीस एल. ई. डी. टी. व्ही, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पिठाची गिरणी, तृतीय क्रमांक बक्षीस गॅस शेगडी, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिक्सर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस इस्त्री अशी बक्षिसे ठेवण्यात आली असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
तसेच याच कार्यक्रमात पाचोरा भडगाव तालुक्यातील अत्यंत नाजूक परिस्थितीतून विकास करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या आनंद मेळाव्यात महिला बचत गटातर्फे पे अँड एन्जॉय विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. तरी जास्तीत, जास्त माता, भगिनीं व तरुणींनी उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.