चर्मकार बांधवांना पाचोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातर्फे गटई वाटप

पाचोरा ( दिलीप जैन. )
पाचोरा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हा जळगाव यांच्यातर्फे चर्मकार समाज बांधवांना पाचोरा तालुक्यामध्ये १० गटई स्टॉल वाटप करण्यात आले.
माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या प्रयत्नाने व कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समाजभुषण पांडुरंग बाविस्कर यांच्या नेतृत्वाने गटई स्टॉल वाटप करण्यात आले. कार्यक्रम येथील स्व. कालिंदीबाई मुकबधीर विद्यालयात घेण्यात आला. गटई वाटप करतांना पूर्ण तालुक्यातील चर्मकार समाज बांधवांनी बबनराव घोलप यांचे सह याकामी प्रयत्नार्थींचे आभार मानले आहेत. स्टॉल वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन देवचंद जाधव, तालुका युवा अध्यक्ष रमेश रामदास पवार आणि राष्ट्रीय चर्मकार समाजाचे सर्व शहर आणि तालुका प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्हा प्रतिनिधी म्हणून आलेल्या समाज बांधवांना पगारे, सावळे, भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे उपस्थितांचे अभिनंदन करुन गटई मिळवुन दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.