गाळण बुद्रुक येथील सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचा वाटेतच मृत्यू .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२३
पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील शेतकरी भिकन बारकु पाटील यांनी शेतात मका पिकाची लागवड केली आहे. या मका पिकात रानडुक्करांनी हैदोस घातला होता. म्हणून या डुकरांना हाकलून लावण्यासाठी भिकन बारकु काळे (वय ४८) हे काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी रात्री अंदाजे ११ वाजेच्या सुमारास शेताकडे गेले होते.
शेतातील मक्याची राखण करत असतांनाच रानडुकरांना पळवून लावण्याच्या नादात शेतातील मक्याच्या शेतातून जातांना सकाळी साडे तीन वाजेच्या सुमारास त्यांना सापाने चावा घेतला ही बाब लक्षात येताच त्यांनी घर गाठले व लगेचच उपचारासाठी पाचोरा निघाले असतांनाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांना ही घटना माहीत पडताच त्यांनी मा. श्री. किशोरजी बारावरकर व ॲड. दिपक पाटील यांना पाचोरा नगरपालिका दवाखान्यात पाठवून पाहिजे ती मदत करण्याचे सांगितले होते. त्यानुसार बारावरकर व पाटील यांनी योग्य ती मदत करत काळे कुटुंबीयांचे सांत्वन करत धीर दिला.
कै. भिकन बारकु काळे हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने आर्थिक परिस्थिती जेमतेम असून यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. यांची परिस्थिती हालाखीची असल्याकारणाने त्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे. या आकस्मिक घटनेमुळे गाळण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.