पाचोरा शहर बसस्थानक परिसरातील देशी दारूचे दुकान शहराबाहेर हलवण्याची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०४/२०२१
पाचोरा शहरात जाण्यासाठीच्या मुख्य रस्त्यावर तसेच पाचोरा बसस्थानक पासून जवळच असलेले देशीदारुचे दुकान शहराबाहेर हलवण्यात यावे ही कारवाई एक महिन्याच्या आत न झाल्यास हजारो महिलांसह हल्ला बोल करत महिलाच हे दुकान बंद करतील व होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असे निवेदन रमेश पंडीत सोनवणे यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्यासह सबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना दिले आहे.
कारण अर्जात नमुद केलेले देशीदारुचे दुकान हे शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर असून जवळच बसस्थानक असल्याने या परिसरातून महामंडळाच्या बसेस येत जात असतात तसेच पाचोरा हे तालुक्याचे शहर व रेल्वेस्थानक असल्यामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात असते म्हणून या प्रवाशांना ने आण करण्यासाठी रिक्षाचालक व्यवसाईक येथे थांबत असतात अश्या या वर्दळीच्या ठिकाणी देशीदारुचे दुकान असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनपैकी दारुडे प्रवासी, काही बसचालक व वाहकांचे दारु पिऊन प्रवासी गाड्या चालवण्याचे प्रमाण वाढले असल्याने अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असल्याची जनमानसातून चर्चा ऐकावयास मिळते. तसेच गावातील व बाहेरून येणारे दारुच्या आहारी गेलेल्या दारुड्यांची येथे यात्राच भरते या कारणामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. दारूड्यांच्या असभ्य वर्तनामुळे या परिसरातील रहिवाशांना विशेष करून महिलावर्गाला दैनंदिन कामासाठी बाहेर निघणे मुश्कील होते. तसेच हे दुकान भरवस्तीत असल्याने या परिसरातील रहिवाशांकडे कोणतेही धार्मिक कार्यक्रम, लग्नसोहळा किंवा इतर कार्यक्रम साजरे करतांना दारुड्यांचा उपद्रव होतो.
तसेच दारुच्या आहारी गेलेले व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपुर्तीसाठी बसस्थानक परिसरात चोऱ्या करतात तर काही घरसंसारपयोगी जिवनावश्याक वस्तू, महिलांच्या अंगावरील दागदागिने, सौभाग्याचे लेण असलेले मंगळसूत्र विकून दारु पित असल्याने बरेचसे घरसंसार बर्बाद झाले असून बरचसे बर्बादिच्या मार्गावर आहेत असे गाऱ्हाणे महिलांनी सांगितले. तसेच शहरात गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले असून कष्टकरी व व्यवसाईक लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
असे असतांना राज्य उत्पादन शुल्क यांच्या कडून सदरचे देशी दारू दुकानांचे संचालकांनी परवाना नूतनीकरण करून पुन्हा याच जागेवर देशीदारुचे सुरू करण्याचा घाट घातला आहे.तरी वरील अडीअडचणी समजून राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी याच जागेवर पुन्हा दुकान चालवण्यासाठी परवाना देऊनये अन्यथा हजारो महिलांच्या मोर्च्यासह हे दुकान बंद पाडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन, प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन रमेश पंडीत सोनवणे यांनी दिले असून निवेदनावर त्यांची सही असून
निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी मा. मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मा. जिल्हाधिकारी सो जळगांवमा. जिल्हा पोलीस अधीक्षक सो जळगांव मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग पाचोरा.मा. उपविभागीय अधिकारी सो पाचोरा.मा. मुख्याधिकारी सो पाचोरा नगर परिषद यांना देण्यात आल्या आहेत.