गोंडगाव येथील स्व. कल्याणीला न्याय मिळवून देण्यासाठी उद्या वरखेडी, भोकरी येथे कडकडीत बंद व निषेध मार्चाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०८/२०२३
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील स्व. कल्याणी या बालवयातील मुलीवर एका नराधमाने अत्याचार करुन तीला जिवे ठार मरले या घटनेचा निषेध करुन नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीसाठी व निषेध नोंदवण्यासाठी उद्या दिनांक ११ ऑगस्ट २०२३ शुक्रवार रोजी संपूर्ण वरखेडी व भोकरी गाव बंद ठेवण्याचा निर्णय वरखेडी व भोकरी येथील ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
दिनांक ११ ऑगस्ट २०२३ शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजता जिल्हापरिषद शाळा, पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालय, उर्दू शाळेच्या शाळकरी मुलामुलींना सोबत घेत संपूर्ण वरखेडी व भोकरी गावातून निषेध रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत सगळ्यांनी सहभागी होऊन कल्याणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तसेच निषेध करण्यासाठी सगळ्यांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन वरखेडी व भोकरी येथील ग्रामस्थांनी केले आहे.