हि अधिवेशनं

दिनांक~३१/१२/२०२२

*ही अधिवेशनं*
*जीव तोडून केलेली भाषणं*
*ते बजेट तो निधी*
*आमच्या साठी नसतोच कधी*
*———————————-*
*त्या कल्याणकारी योजना*
*कागदावरच्या कागदावर राहतात*
*शेवटच्या वाफ्याला मिळत नाही पाणी*
*दांडावरचे मुळे मात्र पोसले जातात*
*————————————–*
*इथे भांडवलदारांचे कर्ज माफ होते*
*आम्ही घेतलेल्या पिककर्जा साठी*
*बँक मुक्कामाला घरी येते*
*—————————————-*
*आमच्या डोळ्यात कधीच कुणाचा*
*वेतन आयोग खूपत नाही*
*मात्र आमच्या पिकाचे भाव वाढले की*
*यांना सहन होत नाही*
*———————————————*
संतोष पाटील
7666447112

ब्रेकिंग बातम्या