यूपीतील बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात आणून, दोन दिवसात गोंडगाव येथील नराधमाचे घर पाडणार. गुलाबराव पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२३
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तीला जीवे मारण्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट् हादरला असून महाराष्ट्रातील गावागावातील कानाकोपऱ्यातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे याकरिता सगळीकडे मार्चे काढून निषेध व्यक्त केला जात आहे.
या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक ०८ ऑगस्ट २०२३ मंगळवार रोजी धरणगाव येथे विविध संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संबंधित करतांना गुलाबराव पाटील म्हणाले की पुर्वीच्या काळात गावता राक्षस यायचे असे ऐकले आहे. परंतु अजुनही असे राक्षस समाजात जिवंत आहेत. गोंडगाव येथील घटना ऐकल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते अशा राक्षसी वृतीच्या नराधमाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.
कारण गोंडगाव येथील एक नऊ वर्षे वयाची स्व. कल्याणी हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचा जीव घेण्यात आला हा नराधम येथेच थांबला नाही तर त्याने त्या नाजुक मुलीचा मृतदेह कडब्याच्या कुट्टीत लपवून ठेवला अशा या नराधमाला लवकरात, लवकर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. तसेच या नराधमाचे गोंडगाव येथील घर पाडण्यासाठी यूपीतील बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रत आणून येत्या दोन दिवसात पाडण्यात येईल याकरिता मी मा. जिल्हाधिकारी व मा. जिल्हा पोलिस अधीक्षक यांना तसे आदेश दिले असल्याचे सांगितले व असे आश्वासन मी शासनाच प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक बाप म्हणून आपणास आश्वासन देतो असे पालकमंत्री म्हणाले.