विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पाचोरा पोलीसांनी केला सन्मान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०७/२०२३
नुकताच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ कंटेनर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांना एक हात मदतीचा म्हणून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पाचोरा प्रखंड व श्रीराम सेना ग्रुप यांच्या माध्यमातून वीस हजार पाचशे रुपयांचा निधी जमा करून त्या अपघातग्रस्त नागरिकांना नुकतीच आर्थिक मदत देण्यात आली होती.
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ साहेबांनी या समाजसेवी कार्याची दखल घेत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पाचोरा प्रखंड व श्रीराम सेना ग्रुपच्या सर्व
पदाधिकाऱ्यांना पाचोरा पोलीस स्टेशनला बोलावून घेत आपण करत असलेले समाजकार्य खरच कौतुकास्पद आहे असे सांगून
त्यांचे अभिनंदन केले व यापुढेही आपल्या हातून अशीच समाजसेवेची कार्य घडोत अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील काळात सामाजिक कार्य करतांना तुम्हाला योग्य ठिकाणी पोलीस प्रशासनाची काही मदत लागल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच योगदान देऊ असे आश्वासन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ साहेबांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी पाचोरा प्रखंड विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री योगेश सोनार, प्रखंड उपाध्यक्ष प्रवीण पाटील, पाचोरा बजरंगदल शहर संयोजक बंटी पाटील, प्रखंड प्रचार, प्रसार प्रमुख योगेश पाटील, प्रखंड सह गोरक्षक राहुल मधुकर पाटील, श्रीराम सेना ग्रुप अध्यक्ष सचिन पाटील व भरत पाटील हे यावेळी उपस्थित होते.