दिलीप जैन.(पाचोरा)

पाचोरा येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव व शितल अकॅडमी पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच चार प्राथमिक शाळांमध्ये एकुण ९५ विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.

पाचोरा येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी शितल अकॅडमी चे संचालक प्रा. रोहन पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे व आकर्षक स्वेटर उपलब्ध करून दिलेत. रोटरी क्लब अध्यक्ष अमोल जाधव, सेक्रेटरी डॉ. गोरख महाजन, प्रकल्प प्रमुख प्रा. शिवाजी शिंदे, समन्वयक निलेश कोटेचा, रो. रुपेश शिंदे, माजी अध्यक्ष अतुल शिरसमणे, राजेश बाबूजी मोर, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक विद्यामंदिर कोंडवाडा गल्ली पाचोरा, शिवाजीनगर प्राथमिक शाळा जळगाव चौफुली पाचोरा, कृष्णाराव नगर प्राथमिक शाळा पाचोरा, व जि प प्राथमीक शाळा गोराडखेडा येथील शाळांमध्ये मुलां मुलिंना साठी स्वेटर भेट देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोंडवाडा गल्ली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, कल्पना पाटील, आर ओ पाटील, शिवाजीनगर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका भोकरे, युवराज मोरे, नाना पवळ, सौ निर्मला पाटील मॅडम, कृष्णराव नगर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील, आत्माराम महाजन, श्रीमती भामरे मॅडम, आणि गोराडखेडा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गुणवंतराव पवार, दीपक धनगर , स्वाती पाटील, उज्वला सोनार व प्रदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.