पिंप्रीहाट येथील मल्ल स्वप्नील पाटील याला आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडून आर्थिक मदत.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०७/२०२२
भडगाव तालुक्यातील पिंपरी वाट येथील सर्वसामान्य कुटुंबातील स्वप्नील अशोक पाटील लहानपणापासूनच वेगवेगळे मैदानी खेळ खेळण्याचा छंद होता. याच छंदातून त्याला कुस्ती खेळण्याचा छंद लागला याच छंदातून गावातीलच मातीत तालीम (व्यायाम) सुरु करत गावातीलच मल्लांकडून कुस्तीचे डावपेच शिकत आहे त्या परिस्थितीत धडे घेऊन आसपासच्या गावातील यात्रोत्सवात कुस्तीच्या आखाड्यात कुस्ती खेळून आपला छंद जोपासत असतांनाच कुस्तीचे डावपेच, त्याची चफळाई व त्याच्या धाडसाचे कौतुक होऊ लागले तसतशी स्वप्नीलची हिंमत वाढत जाऊन आपणही कुस्तीचे चांगले प्रशिक्षण घेऊन आपल्या गावाचे, तालुक्याचे नाव गाजवावे अशी मनापासून इच्छा होती.
परंतु घरची परिस्थीती जेमतेम असल्याकारणाने त्याला चांगल्याप्रकारे तालमीचे प्रशिक्षण घेणे शक्य नसल्याने तो मनोमनी निराश होता. ही बाब पाचोरा, भडगाव तालुक्याचे लिडके आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कानावर येताच त्यांनी लगेचच स्वप्नील पाटील याला आर्थिक मदत करत कुस्तीच्या चांगल्याप्रकारे प्रशिक्षणासाठी पुणे येथील काका पवार तालीम शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली असून संपूर्ण खर्च आमदार किशोर आप्पा पाटील हे करणार असल्याने स्वप्नील पाटील याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
ही आर्थिक मदत करतेवेळी त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन तु पुणे येथुन प्रशिक्षण घेऊन चांगला मल्ल होऊन येशील व आपल्या तालुक्याचे व गावाचे नाव एक दिवस तू नक्कीच मोठे करशील अश्या शुभेच्छा दिल्या यावेळी स्वप्नील पाटील याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. याप्रसंगी युवानेते सुमित दादा पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य संजय पाटील (भुरा आप्पा), युवराज आंबा व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.