अंबे वडगाव परिसरात उद्योगपतीची मनमानी, सर्वसामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१२/२०२२

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे एका उद्योगपतींनी आपला व्यवसाय सुरु केल्यापासून या उद्योगपतींचे अनेक कारनामे समोर येत असून या त्यांच्या कारनाम्यासांठी काही स्थानिक लोकांची मदत घेतली जात असून या मदत करणाऱ्या पैकी गावच्या काही हित शत्रूंनी स्वहित साधण्यासाठी या उद्योगपतींना मदत केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे.

यात विशेष म्हणजे संबंधित फॉक्टरीला ग्रामपंचायतीच्या मुख्य जलवाहिनीवरुन पाणी पुरवठा होत असल्याचे त्रीलायक वृत्त असून याकरिता परवानगी दिलीच कशी हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण गावातील ग्रामस्थांना घड्याळाच्या काट्यावर वेळ पाहून पाणीपुरवठा केला जातो व उद्योगपतीला पाच ते सहा तास तेही मुख्य जलवाहिनी वरुन पाणी पुरवठा केला जातो ही बाब विचारात घेण्यासारखी आहे. म्हणून संबंधित उद्योगपती कडून दंड वसूल करण्यात यावा व पाणी पुरवठा त्वरित बंद करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील वीस वर्षांपूर्वी या उद्योगपतींनी अंब वडगाव येथे आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. संबंधित व्यावसायीक हे मुंबईचे बाबू असल्यामुळे कि काय सर्व कायदे खिशात ठेवून फ्लाईंग केबलचा वापर करत मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी केली होती. हि बाब लक्षात येताच अंबे वडगाव येथील पत्रकार यांनी “विद्युत चोरीसाठी फ्लाईंग केबलचा वापर” या शीर्षकाखाली दैनिक लोकमत या वृत्तपत्रातून बातमी प्रकाशित केल्यावर संबंधित उद्योगपतीवर विद्युत वितरण कंपनीकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

त्यानंतर संबंधित उद्योगपतींनी स्थानिक मजुरांना कामावर घेणे गरजेचे होते. कारण ग्रामीण भागात उद्योग उभारुन स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासन ग्रामीण भागात उद्योग उभारण्यासाठी लाखो रुपये सबसिडी देत असते परंतु संबंधित उद्योगपतींनी स्थानिक मजुरांना खो देत परप्रांतीय मजुरांना कामावर ठेवल्यामुळे स्थानिक मजुरांना आजही रोजगार शोधण्यासाठी गावोगावी भटकंती करावी लागत आहे.

तसेच संबंधित उद्योग हा शेती मालावर आधारित असून याठिकाणी शेती माल खरेदी करतांना पिक उत्पादक शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांना न देता दोन पैसे जास्त मिळतील या आशेने थेट संबंधित उद्योगपतींच्या दारात नेऊन माल विकण्यासाठी प्रयत्न करतात परंतु संबंधित उद्योगपती हा माल उत्पादक शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करत नाही व संबंधित शेतकऱ्याने जास्तच गळ घातली तर चांगल्या प्रतीच्या मालाला बाजारभावाने भाव न देता अत्यंत कमी दराने मागणी करुन खरेदी करण्यासाठी प्रयत्न केला जातो व दुसरीकडे त्याच ठिकाणी तोच शेतीमाल जर व्यापारी घेऊन गेला तर त्याला जास्तीत, जास्त भाव दिला जात असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

थोडक्यात सांगायचे झाले तर व्यापारी व उद्योगपती यांची मिलीभगत असून शेतकऱ्यांचा क्विंटल, क्विंटल माल मोजण्यासाठी लागणारी यंत्रणा, होणारा खर्च वाचविण्यासाठी प्रयत्न केला जात असतो असे बोलले जाते म्हणून मेटाकुटीला आलेला शेतकरी तोच माल खाजगी व्यापाऱ्यांना विकण्यासाठी मजबूर होतो व याच संधीचा फायदा घेत खाजगी व्यापारी भावात व मापात पाप करुन शेतकऱ्यांची लुट करत आहेत.

तसेच याच उद्योगपतींनी आपल्या फॉक्टरीचे रक्षणासाठी भाकरीवर जगणारे ईमानदार शिपाई म्हणून २५ ते ३० कुत्रे पाळले आहेत. हे कुत्रे रात्रीच्यावेळी फॉक्टरीचे रक्षणासाठी बाहेर सोडले जातात याच कुत्र्यांनी मागील आठवड्यात फॉक्टरीच्या परिसरातील जवळपास असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतातील गोठ्यात बांधलेल्या (बकऱ्या) शेळ्यांवर हल्ला चढवून ठार करत त्यांच्या मांसावर ताव मारल्याची घटना घडली असल्हेयाने पशुधन पालक भयभीत झाले आहेत.तसेच कुत्रे जास्त संख्येने असून मस्तावले असल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या किंवा मजुरांच्या सोबत असलेल्या लहान, लहान मुलांना यांच्यापासून धोका निर्माण झाला असल्याचे मत शेतकरी सांगतात.

या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी व उद्योगपतीची मनमानी थांबवण्यासाठी तसेच व्यवसायीकाने शेतकऱ्यांचा शेतीमाल योग्य भावात खरेदी करावा, स्थानिक मजुरांना काम द्यावे, कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा, शासनाच्या अटी व नियमानुसार कामकाज करणे स्थानिक ग्रामपंचायतीला कर भरत नसल्याने अंबे वडगाव ग्रामस्थ लवकर एक सभा घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ब्रेकिंग बातम्या