पळासनेर येथील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना, पाचोरा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्रीराम सेनेतर्फे विस हजारांची मदत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०७/२०२३
आपणही समाजाचे काही देणे लागतो अशी भावना उराशी बाळगून पाचोरा येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्रीराम सेनेतर्फे वर्गणी गोळा करुन धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या पळासनेर येथे कंटेनरच्या झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांना फुल नव्हे तर फुलाची पाकळी म्विहणून स हजार पाचशे रुपये निधी देण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या पळासनेर येथे कंटेनरच्या झालेल्या अपघाताची मन हेलावून टाकणारी बातमी वृत्तपत्रातून वाचण्यात आल्यावर पाचोरा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे प्रखंड मंत्री योगेश सोनार, पाचोरा बजरंग दलाचे शहर संयोजक बंटी पाटील, पाचोरा प्रखंड प्रचार प्रसार प्रमुख योगेश पाटील प्रखंड सह गोरक्षक प्रमुख राहुल मधुकर पाटील, जितू बजरंगी श्रीराम सेना ग्रुप सचिन रघुनाथ पाटील, सचिन संतोष पाटील यांना रहावले गेले नाही व आपणही या समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून पळासनेर येथे जाऊन अपघातात मृत झालेल्या कुटुंबातील लहान, लहान बालक, वडीलधारे माता, भगिनींची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व विस हजार रुपये रोख रक्कम दिली यावेळी संबंधित अपघातग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते.