आरोग्य निरिक्षकास न्यायालयाने २५ हजाराच्या दंडासह सुनवली ५ वर्ष ६ महिने कारावासाची शिक्षा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०५/२०२३
कोविड कालावधीत पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या भडगाव रोडवरील शासकिय निवासस्थाना समोर नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक व दोन व्यक्तींनी मद्यप्राशन करून मुख्याधिकारी यांना अरेरावीची भाषा करत केलेल्या वर्तणुकीबाबत मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांच्या फिर्यादिनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात आज ३ मे २०२३ बुधवार रोजी मा. पाचोरा न्यायालयाने गुन्ह्यातील आरोपी आरोग्य निरिक्षक धनराज पाटील यांना एक कलमानुसार ३ वर्ष शिक्षा व २० हजार रूपये दंड, दुसर्या कलमात २ वर्ष शिक्षा व ५ हजार रूपये दंड. तिसर्या कलमानुसार ६ महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेतील एक आरोपी मयत झाले असुन दुसरे आरोपी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
याप्रकरणी मुख्याधिकारींनी दिलेली फिर्याद अशी की, कोविड, १९ काळात लोकांनी एकत्र येण्या संदर्भात तसेच दारूबंदी संदर्भात जिल्हाधिकारी यांचे वेळोवेळी आदेश असतांना पाचोरा नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक धनराज पाटील यांच्यासह गौतम निकम व एस. टी. सावळे हे तिघे इसम २२ एप्रिल २०२० रोजी नगरपालिकेच्या मुख्यानधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांचे भडगाव रोडवरिल शासकिय विश्राम गृहासमोर अनधिकृतपणे प्रवेश करून मद्य प्राशन करित होते. दुपारी दिड वाजेच्या सुमारास शोभा बाविस्कर ह्या शासकिय निवास स्थानी भोजनासाठी आले असता. शिपाई नितेश रमेश बाविस्कर हे घाबरत, पळत आले व म्हणाले की, वरील तीन व्यक्ती हे अरेरावीची भाषा करित आहेत. असे सांगितल्या नंतर त्यांनी आतमध्ये जाउन पाहीले असता. त्यांच्या ताब्यातील शासकिय विश्राम गृहाच्या पोर्चमध्ये धनराज पाटील, एस. टी. सावळे व गौतम निकम हे तिघेही मद्यप्राशन करित होते. मला पाहुन एस. टी. सावळे व गौतम निकम हे घटनास्थळाहुन पळुन गेले. यावेळी धनराज पाटील यांची चारचाकी क्रं. एम. एच. १९ सी. यु. १८५१ ही सुध्दा माझ्या ताब्यात असलेल्या शासकिय निवासस्थानाच्या आवारात लावली होती. त्यानंतर मी त्यास बोलले की, तुम्हाला असे माझ्या बंगल्यासमोर दारू पितांना लाज वाटत नाही का ? त्यानंतर मी घरात प्रवेश केला असता. धनराज पाटील हे माझ्या मागे मागे येत होते. त्यास मी सांगितले की, मागे येउ नको तरीसूध्दा ते मद्यधुंद अवस्थेत असतांना धनराज पाटील हे मागे येत होते. त्यावेळी महाराष्ट्रात सातीचे संसंर्गजन्य रोग पसरत असतांना त्याची जाणिव असतांना तिघांनी माझ्या परवानगी शिवाय शासकिय निवासस्थानाच्या आवारात गुन्हा करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. म्हणुन पाचोरा पोलिस स्टेशनला २२ एप्रिल २०२० रोजी भाग ०५ गु. र. नं १७६ / २०२० भादवी कलम ३५४डी, ४५२, ४४८, २७०, २६९, १८८, ३४ व मुंबई दारुबंदी अधिनियम १९९८ चे कलम ८५ प्रमाणे गुन्हा नोंदविला होता.
सदर गुन्ह्यात आज पाचोरा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. जी. बी. औंधकर यांनी आज निकाल दिला असुन यात आरोपी एस. टी. सावळे मयत असल्याने ॲबैठ समरी केले होते. आरोपी गौतम निकम यांना या प्रकरणातुन निर्दोष करण्यात आले आहे. आरोपी धनराज पाटील यांना सी. आर. पी. सी. कलम २४८ (२) प्रमाणे दोषी ठरविले असुन त्यांना भादवी कलम ३५४ डी मध्ये तिन वर्ष शिक्षा व २० हजार रूपये दंड, भादवी कलम ४५२ मध्ये २ वर्ष शिक्षा व पाच हजार रूपये दंड. भादवी कलम ४४८ मध्ये सहा महीने शिक्षा अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
(“कानून के हाथ बहुत लंबे होते है”)
आरोग्य निरीक्षक धन+राज पाटील यांच्या गैरवर्तणूकीबाबत तसेच मनमानी कारभाराबाबत बऱ्याचशा तक्रारी समोर येत होत्या अशीही माहिती समोर येत असून आता नुकतेच त्यांना पाचोरा न्यायालयाने दोषी ठरवत सजा सुनावली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक जळगाव, अप्पर पोलिस अधिक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलिस अधिकारी पाचौरा, प्रभारी पोलिस अधिकारी पाचोरा पोलिस स्टेशन, महिला पोलिस उपनिरिक्षक विजया वसावे यांनी काटेकोर पणे केला असुन या खटल्यात सरकारी अभियोक्ता रमेश माने यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पो. हे. का. दिपक पाटील व केसवाच म्हणुन विकास सुर्यवंशी यांनी कामकाज पाहिले. या निकालामुळे पाचोरा शहरासह नगरपालिका विभागात खळबळ उडाली असून सदर प्रकरणात आरोपीस वरील न्यायालयात दाद मागण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.