पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन तर्फे महामानवास अभिवादन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१२)२०२२

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व पूजन करुन अभिवादन करण्यात आले.


याप्रसंगी उपनिरीक्षक मा.श्री.अमोल पवार, सहाय्यक फौजदार आर.के.पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल रणजित पाटील, पोलीस नाईक शिवनारायण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल अरुण राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश लोकरे, अमोल पाटील, दिपक सोनवणे, बाळकडू वृत्तपत्राचे प्रतिनिधी व लेखणीचे शिलेदार पोर्टलचे संपादक सतीश गोपाळ या उपस्थितांनी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन केले.

ब्रेकिंग बातम्या