इलेक्ट्रीक वायर चोरी प्रकरणी भोकरी येथील जाकिर कहाकरला तीन दिवसांसाठी पोलीस कोठडी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०४/२०२२
पाचोरा तालुक्यात विद्यूत पंपाच्या केबल वायरची चोरी होण्याच्या घटना सतत घडत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्र्वर येथून जवळच असलेल्या पिंप्री धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल वायरची चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना घडल्यापासून पाचोरा तालुक्यातील शेतकरी सजग झाले होते. व आपापल्या शेत शिवारातील विद्युत पंप व केबल वायर चोरी होऊ नये म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेत शिवारात गस्त घालण्यासाठी ठरवण्यात आले.
यानुसार दिनांक २५ एप्रिल २०२२ सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सावखेडा बुद्रुक येथील शेतकरी कैलास रामधन परदेशी, जगदिश गोविंद परदेशी, आबा रामदास पाटील, रूमसींग इंदल परदेशी, खंडू सुपडू पाटील हे राजुरी (वाणेगाव) धरण परिसरातील व सावखेडा शिवारात असलेल्या आपल्या शेताकडे फेरफटका मारायला गेले होते. म्हणून कैलास रामधन परदेशी यांनी राजुरी धरणातून पिकांना पाणी भरण्यासाठी विद्यूत पंप बसवून पाइपलाइन टाकलेली आहे. याकरिता त्यांनी ५०० फुट अंतरावरील विद्यूत खांबावरुन ५०० फुट लांबीची तांब्याची केबल वायर टाकून विद्यूत कनेक्शन घेतले होते.
सतत केबल वायरची चोरी होण्याच्या घटना घडत असल्याकारणाने कैलास परदेशी हे दररोज शेतात जाऊन केबल वायर आहे की नाही हे पहात होते. दिनांक २५ एप्रिल २०२२ मंगळवार रोजी रोजच्याप्रमाणे ते केबल वायर पाहण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या शेत गट नंबर ३८/१/२ या शेतात एक इसम हातात केबल वायर घेऊन उभा असल्याचे आढळून आले. म्हणून त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी आपल्या विद्युत मोटारींच्या केबल वायरची पाहाणी केली असता त्यांना केबल वायर जागेवर नसल्याचे दिसून आले. संबंधित इसमाच्या हातातील केबल वायर पाहीली असता ती त्यांचीच असल्याची खात्री झाल्यावर कैलास परदेशी व त्यांच्या सोबत असलेले शेतकरी जगदिश गोविंद परदेशी, आबा रामदास पाटील, रूमसींग इंदल परदेशी, खंडू सुपडू पाटील आम्ही सदरील इसमाला नाव विचारले असता त्याने त्याचे नाव जाकिर मोहम्मद कहाकर भोकरी येथील रहिवासी असलेचे सांगितले तसेच माझी एम. एच. १९ बी.व्ही. १०९१ क्रमांकाची टि. व्ही. एस. एक्सल कंपनीची मोटारसायकल शेताच्या कडेला लावलेली असल्याचे सांगितले.
संबंधित जाकिर कहाकर हा आमच्या शेतात हातात केबल वायर घेऊन आढळून आल्यावर हा वायर चोरी करण्यासाठी आला असल्याची खात्री झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांनी जाकिर कहाकर याला मुद्देमालासह पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला नेऊन त्याच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशान्वये पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेद्रजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांसाठी पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. के. पाटील हे योग्य पध्दतीने करीत आहेत.
शेतकऱ्यांची मागणी~
************
केबल वायरची चोरी करतांना संबंधित आरोपीला रंगेहाथ पकडले असून जाकिर कहाकर हा केबल वायर चोरी करुन कोणाला विकात होता ? तसेच हा चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारा कोण ? चोरीच्या केबल वायरची पुढे कश्या पध्दतीने विल्हेवाट लावली जात होती ? याचा शोध घेणे महत्त्वाचे असून या तपासात पोलीसांना यश आल्यास शेतातील विद्यूत मोटारी, केबल वायर व इतर इलेक्ट्रीकल साहित्य चोरणाऱ्या व हा चोरीचा माल विकत घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.