जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनानिमित्त रंगश्री आर्टच्या विद्यार्थ्यांकडून आगळ्यावेगळ्या शुभेच्छा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०५/२०२३
आज बुध्द पौर्णिमा म्हणजेच संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून आजचा दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करतात. शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुध्दांना ध्यानधारणा करतांना वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली व सुखाचा मार्ग सापडला त्यांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जगातील दुःखाचे निवारण करण्यासाठी त्यांनी अनेक मार्ग सांगितले म्हणून आजचा दिवस हा बौद्ध पौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात जगभर साजरा करण्यात येतो.
या शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांना त्यांच्या जन्मदिनी रंगश्रई आर्ट फाउंडेशनच्या विद्यार्थी कु. वैष्णवी महाजन, कु. चैताली शिंदे, कु. सारिका पाटील, कु. स्वरा कांतायन, ची. रोहित चौधरी, प्रणव देहेडे यांनी श्री. सुबोध कांतायन सरांच्या संकल्पनेतून ऑईल पेस्टल, कलर पेन्सिल, पोस्टर कलर, पेन्सिल शेडींगच्या माध्यमातून त्यांच्या जीवनावर आधारित सुंदर कलाकृतीतून काही चित्रे रेखाटून आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली. बालगोपालांनी रेखाटलेल्या चित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.