बनावट कागदपत्रांच्या आधारे संस्था हडपण्याचा प्रयत्न ९ महिलांविरूध्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८२०२१
पाचोरा येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे संस्था हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ महिलांविरूध्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील नुतन महिला सर्वोदय बाल विकास संस्था ताब्यात घेण्यासाठी बनावट सह्या, बनावट प्रोसिडींग बुक, अजेंडा फाईल, व इतर दस्तऐवज तसेच प्रतिज्ञापत्र सादर करुन जळगांवच्या उप धर्मदाय आयुक्तांकडुन चेंज रिपोर्ट मंजुर करुन घेत संस्था हडपण्याचा प्रयत्न संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी व रुपाली सांळुखेसह इतर ८ संचालकांनी केले
वरील कट कारस्थान उघडकीस आल्याने संस्थेच्या सचिव डॉ. अनुजा तावरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. खोट्या सह्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे जळगांव उप धर्मदाय आयुक्तांनी मंजुर केलेल्या चेंज नं. १८५ / २०२१ या चेंज रिपोर्टला नाशिकच्या सह धर्मदाय आयुक्त यांचेकडे अहवाल दिले असता सह धर्मदाय आयुक्त जे. पी. झपाटे यांनी बनावट चेंज रिपोर्ट मंजुर झालेले नविन संचालक मंडळ रद्दबातल ठरवले जुन्या संचालक मंडळाला कारभार सोपविण्यात आला आहे. या प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
संस्थेच्या सचिव डॉ. अनुजा तावरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी सन २०१४ पासुन सचिव असुन व माझी आई माधवी तावरे ह्या अध्यक्ष आहेत. ९ संचालीका संस्थेचा कारभार पाहत आहेत. ७ जुनरोजी दलीतमित्र निर्मलाताई तावरे माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक संजय पाटील यांच्याकडून रुपाली सांळुखे यांनी पाठवलेले पत्र प्राप्त झाले.
त्यात संस्थेच्या नवीन अध्यक्षा रुपाली साळुंखे व इतर ९ महिला संचालक झाल्या आहेत. त्यांचा कार्यकाल २०१९ ते २०२४ असा आहे. नविन कार्यकाळात मंडळात बदल अर्जदारास उपधर्मदाय आयुक्त यांनी मंजुर केला आहे. जुने संचालक मंडळ जावुन नविन संचालक मंडळ अस्तित्वात आलेले आहे. नविन संचालक मंडळामध्ये रुपाली सांळुखे (अध्यक्षा), मनिषा जोशी (सेक्रेटरी), सविता पाटील (उपाध्यक्ष), तसेच सदस्या सरला पाटील (पाचोरा), हेमांगी जोशी (चाळीसगांव), शैला जोशी (पाचोरा), अनिता सांळुखे, (खेडगांव ता. चाळीसगांव), मनिषा जोशी यांचा समावेश आहे
संशयितांनी संचालक मंडळाची सभा, व अजेंडा, प्रतिज्ञापत्र यासाठी जुन्या संचालक मंडळाच्या खोटया सहया केल्या. सभेचे बनावट कागदपत्र दाखवुन जुन्या सभासदांची फसवणुक केली आहे. संचालकांचा ना हरकत दाखला, संमतीपत्र, यांच्यावर खोटया सहया करण्यात आल्या आहेत. त्याबाबत संस्थेच्या संचालक मंडळाला माहीत नाही. त्यामुळे त्यांचा विश्वासघात व फसवणुक झाली आहे. अॅड. कालींदी चौधरी (नोटरी जळगांव) यांच्याकडे आम्ही कधीही अॅफिडेव्हिट केलेले नाहीत. तेही कागदपत्र बनावट व खोटया सहया करून सादर केलेले आहेत. नवीन संचालक मंडळातील सदस्य सरला पाटील संस्थेच्या (कर्मचारी) शिक्षीका म्हणुन कार्यरत आहेत. त्यांनीही जुन्या विश्वस्त मंडळाची फसवणुक व विश्वासघात केला आहे.
या तक्रारी नुसार पाचोरा पोलीसांनी रूपाली सांळुखे, सविता पाटील, मनिषा जोशी, मनिषा जोशी, शैला जोशी, अनिता सांळुखे, सरला पाटील, हेमांगी जोशी यांच्याविरूध्द पाचोरा पोलीस स्टेशनला भा. द. वि.कलम ४०६, ४०९, ४१७, ४२०, ४६३, ४६५, ४६८, ४६४, ४६६, ४७१, १२० (ब) प्रमाणे गुन्हा नोंदविलेला आहे.
दरम्यान उपधर्मदाय आयुक्तांनी दिलेलय चेंजरिपोर्टला आव्हान देणारी याचीका डॉ. अनुजा तावरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाने सह धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दाखल केली होती त्याआधारे अपीलाची सुनावणी होवुन २९ जुलैरोजी सह धर्मदाय आयुक्त, जे. पी. झपाटे यांनी उप धर्मदाय आयुक्त यांनी दिलेला चेंज रिपोर्टला रद्द ठरवुन जुन्या संचालक मंडळाच्या बाजुने निकाल दिला आहे. संचालक मंडळाच्या वतीने अॅड. महेंद्र भावसार यांनी काम पाहिले. जुन्या विस्वस्त मंडळाच्या अध्यक्षा म्हणुन माधवी तावरे व संचालक मंडळ हे काम पाहत आहे. बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदेशीर संस्था हडपणाऱ्यांना कधी अटक होते ? याकडे शैक्षणिक क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागुन आहे.