सोयगावच्या व्यवसायिकाचे लोहारी जवळ मोटारसायकलला कार आडवी लाऊन ५०,३०० रुपये लुटले. ही घटना संशयास्पद सखोल चौकशी होण्याची गरज.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०२/२०२२
सोयगाव येथील व्यवसायीक दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ शुक्रवार रोजी पाचोरा येथून मोटारसायकलने आपल्या गावी जात असतांना लोहारी गावाजवळील इंदिरानगर जवळ भररस्त्यावर रात्री ०८.१५ चे सुमारास अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलला कार आडवी लाऊन मारहाण करत व्यवसायिकाजवळील बॅग हिसकावून चोरट्यांनी पाचोरा शहराकडे फळ काढला या रस्तालुटीत दागिने व रोख असे एकूण ५०,३०० रुपयांचा ऐवज त्यांनी लांबवला आहे. या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांन विरुद्ध रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
परंतु ही घटना घडल्यापासून पंचक्रोशीतून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. तसेच या परिसरात फेरफटका मारुन कानोसा घेतला असता लोहारी येथील इंदिरानगर परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील मजूर लोकांचा दैनंदिन कामासाठी रात्री या परिसरात वावर असतो व रस्ता लुटीची घटना ही फिर्यादीच्या म्हणण्यानुसार रात्री ०८.१५ वाजता घडली आहे. व या वेळात या भागात वर्दळ असते. तसेच विशेष म्हणजे दुचाकीला मागाहून येणाऱ्या चारचाकी वाहनाने अडवून रस्तालुट केली असे फिर्यादीचे म्हणने आहे. तसेच बॅग हिसकावून घेत चारचाकी वाहन परत पाचोरा शहराकडे वळवतांना बराच अवधी लागला असेल मग हे घडत असतांना संबंधित फिर्यादीने मदतीसाठी आरडाओरडा का केला नाही असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण रस्त्यालगतच इंदिरानगर वस्ती आहे.
फिर्यादीने दिलेली तक्रार, घटनेचा घटनाक्रम व घटनेचे स्थळ व वेळ यात बरेचसे प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी या घटनेची सखोल चौकशी होऊन दुध का दुध, पाणी का पाणी करुन या परिसराची हकनाक होणारी बदनामी थांबवावी अशी मागणी जनमानसातून होत आहे.
(घटना घडल्यापासून ते घटनेनंतरचे घटनास्थळाचे भ्रमणध्वनी रेकॉर्ड तसेच फिर्यादीचे (सी.डी.आर.) काढणे गरजेचे आहे.)