शिंदाड गावातील गावठी दारु सह सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद न झाल्यास शिंदाडच्या महिला धडकणार मंत्रालयावर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे मोठ्याप्रमाणात सट्टा, पत्ता, जुगारासह गावठी दीरुची निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरु असल्याने शिंदाड गावातील वातावरण अशांत झाले आहे. तसेच शिंदाड येथे गावठी दारुची निर्मिती खुप मोठ्याप्रमाणात केली जात असून ही गावठी दारु आसपासच्या दहा खेड्यावर पुरवली जाते तसेच या अवैध धंदे करणारांवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने या अवैध धंदे करणारांची मग्रुरी वाढली असल्याने व कायदा आमचे काहीच वाकडे करु शकत नाही असा त्यांचा गोड गैरसमज झाला आहे.
याच गोड गैरसमजामुळे या अवैध धंदे करणारांची गुन्हेगारी करण्याची हिंमत वाढली असल्याचे दिसून येत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे काल संध्याकाळी याच लोकांच्या एका गटाने काही टवाळखोर तरुणांना हाताशी धरुन मागच्या भांडणाचा राग मनात ठेवून शिंदाड गावात अरेरावीची भाषा वापरुन भांडण केले होते. या भांडणाची कुणकुण पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांनी त्वरित शिंदाड येथे येऊन परिस्थिती आटोक्यात आणत सगळ्यांना शांतता राखण्यासाठी आवाहन केले होते.
या
परंतु काही भांडखोर लोकांनी या वादाचा राग मनात ठेवून दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ शनिवार रोजी हातात लाठ्या, काठ्या, कोयते हातात घेऊन पंचवीस ते तीस तरुणांनी काही महिला सोबत घेऊन शिंदाड गावातील काही भागातील गल्लीबोळात घुसून दगडफेक करत घरांचे दरवाजे, खिडक्यांची मोडतोड व काचा फोडत घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार सुरु होताच काही सुज्ञ नागरिकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला याबाबत सविस्तर माहिती कळवली माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत शिंदाड गाव गाठले.
शिंदाड येथे येऊन वातावरण शांत करण्यासाठी प्रयत्न करत असतांनाच काही दंगलखोरांनी पोलिसांच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी वरिष्ठांना कळवल्यावर लगेचच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत शिंदाड गावात येऊन परिस्थिती आटोक्यात आणली तसेच दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले असून शिंदाड गावाला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन योग्य त्या सूचना करत दंगलखोरां पैकी काही महिला, पुरुष व तरुणांना ताब्यात घेतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तसेच आज सायंकाळी शिंदाड गावातील वातावरण शांत असून घडलेल्या दंगली बाबत शिंदाडच्या ग्रामस्थांचे जाबजबाब घेऊन गुन्हा नोदवण्याचे काम सुरु असून दंगलखोरांपैकी काही महिला व पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समोर येत आहे.
या सगळ्या प्रकारात अवैध धंदे करणारे लोक सामील असून यांनी गावात दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचे बोलले जात असून शिंदाड गावातील गावठी दारु निर्मिती, विक्री तसेच सट्टा, पत्ता, जुगारासह सर्व प्रकारचे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा आम्ही शेकडो महिला थेट मंत्रालयावर मोर्चा नेणार असल्याच इशारा शिंदाड येथील असंख्य महिला, पुरुष व तरुणांनी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून केला आहे.