पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी, उद्या महाविकास आघाडीतर्फे मतदार मेळाव्याचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०४/२०२३
कृषी उत्पन्न समिती पाचोरा, भडगावच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या २० एप्रिल २०२३ गुरुवार रोजी माघारीची अंतिम तारीख असून २८ एप्रिल २०२३ शुक्रवार रोजी मतदान होणार आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडी पॅनलची भुमिका व महाविकास आघाडी पॅनल कडून मतदारांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी महत्त्वाच्या विषयावर हितगुज करत सविस्तर चर्चा करुन निवडणुकीत मतदारांशी संपर्क साधण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे मतदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी या मेळाव्यात पाचोरा, भडगाव तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे सर्व सन्माननीय संचालक, तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य, हमाल मापाडी मतदार बंधू भगिनींनी या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे नेते तथा आपले मार्गदर्शक माजी आमदार मा. श्री. दिलीपभाऊ वाघ, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, शिवसेनेच्या नेत्या (उबाठा) सौ. वैशालीताई सुर्यवंशी हे आपल्याशी हितगुज साधणार आहेत आणि मतदारांची मते जाणून घेणार आहेत. तसेच पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठीचा हा मेळावा महत्वाचा आहे. तरी आपण हे निमंत्रण स्वीकारून उपस्थिती द्यावी ही आग्रहाची नम्र विनंती करण्यात आली आहे.
हा मेळावा दिनांक १५ एप्रिल २०२३ शनिवार रोजी सकाळी ठिक १० वाजता बोहरी फार्म, निर्मल सिडस् जवळ, पाचोरा येथे घेण्यात येणार आहे तरी सर्व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सर्व संचालक तसेच ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य, हमाल, मापाडी यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन विकास पाटील. (सर), पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे भडगाव तालुकाध्यक्ष राहुल पाटील, अनिल पाटील, रतीलाल महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसळ उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आयोजकांनी केले आहे.
टिप : मेळावा संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.