पाचोरा, भडगावच्या आमदारांनी केले काय, खाली डोकं वरती पाय. असे म्हणण्याची वेळ निष्ठावंत शिवसैनिकांवर येऊ नये.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०६/२०२२
(आप्पासाहेबांनी शिवसेने सोबत एकनिष्ठ राहून जनहितार्थ भाजपासोबत युती केली तर वावगे ठरणार नाही. मात्र शिवसेने सोबत एकनिष्ठ राहून निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा.)
प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं, असे का म्हणतात ?
मग युद्ध, एक अशी प्रक्रिया जी अविरत चालूच असते, कधी उघड कधी लपून छपून. ज्यात जिंकणे हाच एकमात्र धर्म असतो, त्यासाठी मग सगळे डाव लावले जातात, छक्के पंजे खेळले जातात, कधी समोरच्याचा वजीर चोरला जातो कधी तो मारला जातो.
असाच काहीसा प्रकार सध्या राजकारणात सुरू आहे. कारण राजकारण सुध्दा एक युध्दच आहे. फरक एवढाच की या आधी राजे, महाराजे सत्तेसाठी परंतु (जनहितार्थ) सत्तेसाठी समोरासमोर युद्ध लढत असत कधीकाळी गनीमी कावा तर कधी तह करुन नंतर पुन्हा बंड करून आपला हेतू साध्य करण्यासाठी खेळी खेळत असतं परंतु काळानुरूप राजेशाही गेली व लोकशाही आली तेव्हा अब्राहम लिंकन कृत व्याख्येनुसार लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही
परंतु आता तशी लोकशाही शिल्लक नसल्याचा अनुभव पदोपदी येत आहे. जो तो लोकांनी निवडून दिल्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी सतत सजग रहाण सत्ता हातातून जाऊ नये म्हणून निष्ठा, प्रतिष्ठा, गहाण ठेवून फक्त आणि फक्त स्वहित साधून दुनिया जाय *ड मे हमे क्या पडी असे राजकारण करणारांची संख्या मोठी प्रमाणात वाढत चालली आहे.
असे होत असतांनाच जे आमदार, खासदार, मंत्री आहेत त्यांच्यावर किंवा त्यांच्या परिस्थितीत काही एक बदल होत नाही. व सत्तेसाठी पक्षांतर केले तरी त्यांना काहीच वाटत नाही. कारण त्यांच्याजवळ असलेली अमाप संपत्ती, पैसा व सोबतच सत्ता असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होत नाही.
तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला व मातीतल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना खुपच वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते. यात जास्तीत, जास्त होरपळला जातो तो म्हणजे बॅनर, पोस्टर सोबतच हातात पक्षाचे झेंडे घेऊन गल्लोगल्ली फिरणारा वेळप्रसंगी समोरच्या प्रतिस्पर्धी गटांशी संघर्ष करतांना स्वताची डोकी फोडून घेणारा निष्ठावंत कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन फिरणारा असतो तोच कार्यकर्ता मातीमोल होतो.
कारण जो हाडामासाचा सच्चा कार्यकर्ता आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवून आपल्या पदरात काही पडो ना पडो याची अपेक्षा न बाळगता फक्त नेते मंडळींनी दिलेल्या आश्वासनांवर जगत असतो. तोच कार्यकर्ता आपला राजा, आपला सेनापती निघून गेल्याने पोरका होतो. त्याला कुठलाच पर्याय नसतो. कारण त्यांच्याजवळ दोन वेळच्या जेवणाची सुध्दा ऐपत नसते. अशा कंगाल परंतु मनाने श्रीमंत असलेला कार्यकर्त्यांना शेवटी राज भिकारी अस म्हणून आहे त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. कारण यांच्या परिस्थितीमुळे यांना कोणीही लवकर स्वीकारत नाही.
आता असाच काहीसा प्रसंग आपल्या पाचोरा, भडगाव तालुक्यातील शिवसैनिकांवर येतो की काय अस वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई येथून क्षणाक्षणाला येणाऱ्या बातमीमुळे निष्ठावंत, ज्ञानवंत, गुणवंत असलेल्या नागरिकांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून
पाचोरा, भडगाव तालुक्याच्या आमदारांनी केले काय खाली डोकं वरती पाय अशी म्हणण्याची वेळ येऊ नये हिच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.