तालुक्यातील सर्वच गावातील विद्यूतचोरांवर कारवाई व्हावी सुज्ञ नागरिकांची मागणी
दिलीप जैन. ( पाचोरा )
लोहारा येथील हेमंत गुरव यांच्या तक्ररीवरुन पाचोरा येथील विद्यूतवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोहारा येथे जाऊन काल दिनांक १० बुधवार रोजी खुशी मेडिकल व जनरल स्टोअर्स मध्ये सुरु असलेली विद्यूतचोरी पकडली या कारवाई निमित्ताने लोहारा गावत अधिक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बाळू भावलाल जैन यांच्या घरामध्ये मध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून होत असलेली वीज चोरी लोहारा येथील नागरिक श्री.शाम रमेश पालिवाल यांच्या सतर्कतेने व त्यांच्या तक्रारी अर्जावरून सदरच्या घरात व समोरील हनुमान मंदिराच्या नावाने होत असलेली फार मोठ्या प्रमाणावर वीज चोरी पकडली शाम रमेश पालिवाल यांच्या समोर प्रत्यक्ष पाहणी करून बुधवार दिनांक २१/१०/२०२० रोजी महावितरण विभागाचे विलास डी. सिडाम-सहायक अभियंता , उपविभागीय कर्मचारी जोशी ,लेखापाल अगवाल , लिपिक भालेराव , फोरमॅन ,व कर्मचारी निलेश शेळके , मनोज सोनार , रवी राऊत व कर्मचारी यांनी पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यासाठी हेमंत गुरव व ग्रामस्थांसमोर रितसर पंचनामा करून व कारवाई करण्यात आली आहे असा लेखी जवाब घेवून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी रवाना झाले