बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार मेळाव्यातून आमदार किशोर आप्पा पाटील साधणार मतदारांशी संवाद.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२३
जिल्ह्याभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा धुराळा उडालेला असून पाचोरा, भडगाव बाजार समितीमध्ये देखील १८ जागांसाठी तब्बल २३४ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर २० एप्रिल २०२३ गुरुवार रोजी होणाऱ्या माघार प्रक्रियेच्या नंतर निवडणूकीचे खरे चित्र समोर येणार असले तरी आतापासूनच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी निवडणूक तयारीत आघाडी घेतली असून याच दरम्यान तयारीचा भाग म्हणून पाचोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सदस्य तथा मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिनांक ०८ एप्रिल २०२३ शनिवार रोजी सकाळी १०.३० वाजता मोंढाळा रस्त्यावरील तुळजाई जिनिंग येथे पाचोरा तालुक्यात स्वतंत्रपणे सहकार मेळाव्यांचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यात उपस्थित रहाण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व विविध कार्यकारी सोसायटी सदस्य यांना लेखी पत्र देऊन उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून या मेळाव्यात मतदार संघातील सहकार चळवळीवर चर्चा, विमर्श करुन उपस्थितांची मते जाणून घेतली जाणार आहेत.