सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२६/०३/२०२३ ‌‌

पाचोरा तालुक्याचे दिगवंत माजी आमदार स्व. आर. ओ. पाटील यांच्या सुकन्या निर्मल उद्योगसमूहाच्या संचालिका तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडे कोणतीही सत्ता किंवा पद नसतांनाही फक्त आणि फक्त आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना मनात बाळगून दिनांक २७ मार्च २०२३ सोमवार रोजी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील श्री. हनुमान मंदीराचे परिसरात कांताई रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सकाळी ०९ वाजेपासून तर दुपारी ०३ वाजेपर्यंत मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.

तरी पंचक्रोशीतील गावागावातून सर्व गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.