सण, उत्सवाचे पार्श्वभूमीवर शेंदूर्णी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२३
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी हे मोठ्या बाजारपेठेचे शहर असून या शेंदुर्णी शहरात दिनांक ३१ मार्च २०२३ शुक्रवार रोजी मोमीन गल्लीत थोडासा गैरसमज झाल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पहुर पोलिस स्टेशन व शेंदुर्णी दूरक्षेत्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघे गटातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत जमावाला वेळीच शांत केल्यामुळे पुढील अनर्थ टळला होता.
त्याअनुषंगाने व पुढील आठवड्यात येणारे धार्मिक उत्सव लक्षात घेऊन हे उत्सव शांततेत व सर्व मिळून साजरे व्हावेत व आपसातील मतभेद विसरून दोन समाजांतील भाईचारा कायमस्वरूपी अबाधित रहावा दोघांचे मनोमीलन घडवून यावे याकरीता दिनांक ०५ एप्रिल २०२३ बुधवार रोजी मोमीन गल्ली व गोंधळ पुरा यांच्या कॉर्नरवर छोटेखानी (मिटींग) सभेचे आयोजन केले होते.
(पोलिस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे.)
शेंदूर्णी शहर हे मोठ्या लोकसंखेचे व तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते हा नावलौकिक कायम टिकवून ठेवण्यासाठी हिंदू, मुस्लिम बांधवांनी आपसातील मतभेद विसरुन भाईचारा टिकवून ठेवत शेंदुर्णी शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने रहावे तसेच हिंदू, मुस्लिम बांधवांनी येणारे सन, उत्सव मनात कोणताही भेदभाव न ठेवता एकत्रितपणे साजरे करुन आम्ही सर्व एक आहोत हे सिद्ध करुन द्यावे तसेच सणासुदीचे दिवसात कुठल्याही प्रकारची किंवा गोष्टीची शहानिशा केल्याखेरीज अफवांवर विश्वास ठेऊ नये. कारण प्रत्येक समाजात काही विघ्न संतोषी लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी नको ते उपद्व्याप करत असतात अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. असे गैरप्रकार कुणीही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोरात, कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत कुणीही चुकीचे वर्तन केल्यास लगेचच पोलिसांना कळवावे असे आवाहन पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे यांनी केले आहे.
या कॉर्नर मिटींला शेंदुर्णी पोलिस चौकीचे पोलीस उपनिरक्षक दिलीप पाटील, पोलीस उपनिरक्षक शशिकांत पाटील, व सामाजिक नेते राजू पवार, मुस्लीम नेते मंसुर पिंजारी, सुनील चौधरी . आसिफ खलिफा, जग्गू जोहरे, ऐजाज सैय्यद, कदिर खान, शाकीर पिंजारी व बहुसंख्य हिंदू, मुस्लिम बांधवांनी उपस्थीती देत आपापल्या अडीअडचणी समजून सांगत त्या सोडविण्यासाठी विनंती केली. या कॉर्नर मिटींमुळे दोघ समाजातील समज, गैरसमज दूर होतील अशी अपेक्षा उपस्थितीत नागरिकांनी व अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच
गजानन मित्र मंडळाच्या वतीने ०९ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजित करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले असून या इफ्तार पार्टीला सर्व हिंदू मुस्लीम बांधवांनी उपस्थित राहून एकतेचा संदेश द्यावा असे आयोजकांच्या वतीने सागण्यात आले आहे .