पाचोरा शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची (उ. बा. ठा.) सेनेची मागणी
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०७/२०२३
सद्यस्थितीत आपल्या ताब्यातील स्वयंचलित दुचाकी व चारचाकी वाहने पळवणे ही वाढती फॅशन झाली असून मुख्य रहदारीच्या रस्त्यावर बेशिस्तपणे भरधाव वेगाने वाहने पळवणे वाहने पळवतांना सर्कशीतल्या माकडा प्रमाणे आपल्या ताब्यातील दुचाकी वाकडी, तिकडे करुन चमकोगिरी करणे असे प्रकार वाढले असून पाचोरा शहरात दररोज लहान, मोठ्या होणाऱ्या अपघाताची संख्या वाढली आहे. यामुळे पायी चालणाऱ्या वाटसरुंनाही याचा सामना करावा लागत असल्याची बाब लक्षात घेऊन पाचोरा येथील (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेच्या वतीने पाचोरा शहरातील पाचोरा शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी निवेदनाद्वारे मा. प्रांताधिकारी साहेब, नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात पाचोरा शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, कॉलेज चौक, श्री. साई मंदिर चौक, निरामय हॉस्पिटल, सुपडू भादू शाळा, कन्या शाळा, जागृती विद्यालय, बसस्थानक, जारगाव चौफुली व इतर ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने गतिरोधक बसवून रस्त्यावर गतिरोधक आहेत हे लक्षात येण्त्यायासाठी त्याठिकाणी झेब्रा क्रॉसिंग म्हणजे (सफेद रंगांचे पट्टे) रंगवण्यात यावेत तसेच गतिरोधकाच्या अंदाजे दहा मीटर लांब दोघ बाजूला (पुढे गतिरोधक आहेत) असा माहिती दर्शक फलक लावण्यात यावा म्हणजे गतिरोधकावर वाहन आदळून अपघात होणार नाही अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेचे तालुकाप्रमुख शरद भाऊ पाटील, शहरप्रमुख अनिल भाऊ सावंत, शहर प्रमुख दीपक पाटील, माजी शहर प्रमुख भरत खंडेलवाल, शहर संघटक राजेंद्र राणा, शहर समन्वयक बंडू भाऊ मोरे, पप्पू भाऊ राजपूत, माजी उपशहर प्रमुख कैलास मिस्तरी,
युवा सेना तालुकाप्रमुख भूपेश सोमवंशी, अभिषेक खंडेलवाल,
संजय चौधरी, नितीन लोहार, पप्पू भाऊ जाधव, गफफार भाई शेख व शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते यांनी स्वाक्षऱ्या करुन सगळ्यांच्या उपस्थितीत निवेदन दिले आहे.
*******************************************************
(पाचोरा शहरात अल्पवयीन मुले, मुली भरधाव वेगाने तीन सीट बसवून वाहने पळवतांना दिसून येतात हा गैरप्रकार थांबवण्यासाठी कुटुंबप्रमुखांनी आपल्या मुला, मुलींना समजून सांगणे गरजेचे आहे. तसेच पाचोरा पोलिसांनी अशा वाहन चालकांवर कडक कारवाई करावी अशी अपेक्षा पाचोरा शहरातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.)
********************************************************