वालावल येथे आरोग्य शिबिर संपन्न

कुडाळ 

श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल व ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वालावल येथे मोफत वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन कुडाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजयकुमार ओरोसकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नेत्र तपासणी, दंत तपासणी,रक्तदाब तपासणी, आजाराच्या विविध तपासण्या,रक्ताच्या विविध तपासण्या, करण्यात आल्या. मोफत औषधेही देण्यात आली. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता, डॉ.ओंकार वेदक, डॉ.अपूर्वा ठाकूर, डॉ.मिर्नवास परब, डॉ. प्रणव प्रभू, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी ग्रा.पं.वालावलचे ग्रामसेवक सतीश साळगावकर, ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळस्कर, ग्लोबल फाउंडेशनचे गुरु देसाई, योगेश गावाडे, ट्रस्टच्या सदस्या सिमा चौधरी,रेश्मा साळसकर,शीतल लाड, चित्रा शेठ, इतर उपस्थित व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या