पिंपळगाव हरेश्वर येथील ७५ वर्षीय गिते सरांनी केली कोरोनावर मात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०४/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वरचे उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वरचे माजी अध्यक्ष, पि.टी.सी.शैक्षणिक संस्थेचे माजी मुख्याध्यापक तसेच मागील ३० वर्षापासून माळी समाजाचे अध्यक्षपद सांभाळून जनसेवेचा वसा हाती घेत जनहितार्थ सतत झटणारे शिस्तप्रिय असे मा. श्री. सुकदेव तोताराम गिते वय वर्षे ७५ यांनी कोरोनावर मात करत काल दिनांक २७ एप्रिल पासून पुन्हा ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत जनसेवेला सुरवात केली आहे.
पिंपळगाव हरेश्वरचे उपसरपंच मा.श्री. सुकदेव तोताराम गिते सरांना थोडा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी दिनांक ०५ एप्रिल सोमवार रोजी कोरोनाची टेस्ट केली होती. त्या टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आले परंतु पॉझिटिव्ह आल्यावरही घाबरून न जाता त्यांनी पाचोरा येथील डॉ. अमित साळुंखे व सुधन हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत पाटील. यांच्याशी संपर्क साधून सुधन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती झाले.
सुधन हॉटेलमध्ये डॉ.अमित साळुंखे. व डॉ.प्रशांत पाटील यांनी दिनांक ०५ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत योग्य उपचार केल्याने त्यांना बरे वाटायला लागल्याने त्यांनी १० एप्रिलला दवाखान्यातून घरी येऊन दिनांक २७ एप्रिल मंगळवार पर्यंत होम कॉरंटाईन करुन घेत डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधोपचार घेतले व ठणठणीत बरे होऊन लगेचच ग्रामपंचायत कारभाराची सुत्रे हाती घेतली.
मा.श्री. सुकदेव गिते यांच्या मते कोरोना हा साध्य आजार असून योग्य वेळी योग्य उपचार घेऊन पथ्य पाळल्यास कोरोना आजारातून आपण बरे होऊ शकतो. परंतु लोकांनी कोरोनाची धास्ती घेत गैरसमज करुन घेतला आहे. तरी यापुढे कोणालाही कोरोना होऊनये म्हणून प्रत्येकाने सामाजिक अंतर राखत दैनंदिन कामे पूर्ण केली पाहिजे. गर्दी करणे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. सतत मास्क वापरून हात स्वच्छ ठेवले पाहिजे. म्हणजे कोरोनापासून वाचता येईल तसेच काही लक्षणे जाणवल्यास त्वरित टेस्ट करुन घेत उपचार घेतल्यास कोरोना आजार नक्की बरा होतो म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनान, प्रशासन व आरोग्य विभागाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या सुचनांचे व नियमांचे पालन करा तसेच मला कोरोना आजारातून मुक्त होण्यासाठी डॉक्टरांची योग्य उपचारपद्धती व जनतेचे आशिर्वाद कामी आल्याचे सांगत माझ्या पुढील आयुष्य जनसेवा करण्यासाठी मी झटत राहील असे सांगितले.