आदिवासी बालिका मृत्यू प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारा विरुध्द दिलेल्या तक्रारीचा निषेध करत, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलिस प्रशासनाला दिले निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/११/२०२३
******************************************************************
भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी.
*******************************************************************
पाचोरा शहरातील वृंदावन हाॅस्पिटलमध्ये १५ दिवसाच्या बालिकेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांनी १४ नोव्हेंबर रोजी रात्री तक्रार अर्ज देऊन कारवाईची मागणी केली होती. तसेच दिनांक १६ नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन सदरचा प्रकार पुराव्प्रयानिशी सार माध्यमांना सांगितला होता.
यानंतर याविषयाची येथील पत्रकाराने बातमी सोशल मिडियावर लावल्याने वृंदावन हाॅस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संबंधित पिडित कुटुंब, सुधाकर वाघ व वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आषयाचा तक्रारी अर्ज दिला आहे. या अर्जाच्या निषेधार्थ तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी १७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देते प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाखडा, तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, शहर अध्यक्ष प्रविण ब्राम्हणे, तालुका उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, राहुल महाजन, दिलीप जैन, अनिल (आबा) येवले, राकेश सुतार, कुंदन बेलदार, भिकन पाटील, दिलीप परदेशी, रविशंकर पांडे, जावेद शेख, दिलीप एम. पाटील, गजानन गिरी, परशुराम नाईक उपस्थित होते.
१४ नोव्हेंबर २०२३ रोजी वडधे ता. भडगाव येथील अनिल मालचे व अनिता मालचे या आदिवासी कुटुंबाचे १५ दिवसीय नवजात बालकाला योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप करत मालचे कुटुंबीयांनी पाचोरा शहरातील वृन्दावन हॉस्पिटल विरुद्ध १४ रोजी रात्रीच तक्रार अर्ज केला आहे. त्यासंदर्भात पोलीस आपल्या पातळीवर चौकशी करत आहे. दरम्यान पोलीस स्टेशनला आलेल्या तक्रारी अर्जाच्या अन्वये पोलीस स्टेशन मधून माहिती घेऊन सदर घटनेचे वार्तांकन करण्यात आले. वार्तांकन करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असून अन्यायकारक वाटणाऱ्या घटनेला वाचा फोडून पीडितांची बाजू जनतेसमोर आणणे हा पत्रकार म्हणून आमचा अधिकार असून आमची नैतिक जबाबदारी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करून पीडितांच्या अर्जान्वये योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशा आषयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलिस प्रशासनास देण्यात आले आहे.