श्री. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त १५ फेब्रुवारी रोजी पाचोरा शहरात भव्य रॅलीचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२३

बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री. संत सेवालाल महाराज यांच्या २८४ वी जयंती सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून या जयंतीनिमित्त दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी पाचोरा शहरात पायी रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत (शोभायात्रेत) सहभागी होण्यासाठी पाचोरा, भडगाव तालुक्यातील सर्व गोर बंजारा बंधु आणि भगिनींनी आपला पारंपरिक लेगी, फेटा परिधान करून या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन श्री. संत सेवालाल महाराज सांस्कृतिक उत्सव समिती पाचोरा, भडगावच्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे मा.आ.श्री.आप्पासो किशोरआप्पा पाटील, मा. आ. श्री. भाऊसो दिलीपभाऊ वाघ, मा. श्री. भाऊ साॊ. अमोलभाऊ शिंदे.(भाजपा तालुकाध्यक्ष), मा. श्री. दादासाॊ. मेहताबदादा नाईक. (जि. बँक संचालक जळगाव), दादा साॊ. डॉ. विजय जाधव. (संचालक जाधव हॉस्पिटल पाचोरा), दादा साॊ. डॉ. स्वप्नील पाटील. (संचालक सिद्धिविनायक हॉस्पिटल पाचोरा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी श्री. संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त पाचोरा शहरातील रामदेव लॉन्स येथून दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी सकाळी ०८ वाजता ढोल, ताशा व डीजे च्या वाद्यात वाजतगाजत मोठ्या जल्लोषात पायी रॅली व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर सकाळी ११ वाजता रामदेव लॉन्स येथे रॅलीची सांगता करण्यात येणार असून तदनंतर लगेचच बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत लेंगी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम व सादर करण्यात येणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री. संत सेवालाल महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ठिकाणी अशी विनंती श्री. संत सेवालाल महाराज सांस्कृतिक व उत्सव समिती पाचोरा, भडगावच्या वतीने करण्यात आली आहे.