दामीनी पथक क्र २ व माणुसकी समुहाच्या सहकार्याने रेखा बघाटे नावाच्या मनोरुग्ण महिलेला मीळाला आधार
लोहारा प्रतिनिधी::-
रेखा अशोक बघाटे वय ५१ वर्ष रा. सातारा परिसर असे सांगितले. मनोरुग्ण महिला बाबा पेट्रोल पंप परीसरात धर्मदाय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालयाच्या समोर फिरत होती.हे सगळे ये जा करनाऱ्या नागरीकांना दिसत होती पन ? काय करनार वेळेच्या जाळ्यात व आपल्याला काय पडल म्हणुन समाजातील रोडवर जानाऱ्या व्यक्ती बघुन सोडुन देत होत्या पन काही समाजात बोटावर मोजन्याइतके लोक चांगले असतात त्यातीलच एक महिला अधिकारी धर्मदाय आयुक्त कार्यालयात उपायुक्त म्हणुन काम करनाऱ्या महिला अधिकारी श्रीनिवार मॅडम यानीं सदरील महिलेची माहिती पोलीस दामीनी २ पथकाला सदरील महिलेची माहिती दिली. दामीनी पथकाच्या उप पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा करेवाड मँडम व त्याच्या दामीनी पथकाने सदरील महिलेस बाबा पेट्रोल पंप येथुन ताब्यात घेतले व ती मनोरुग्ण असल्याचे कळताच माणुसकी समुहाचे सामाजिक कार्यकर्ते सुमित पंडित याच्याशी संपर्क करुन सदरील महिलेची माहिती दिली त्यानी लगेचच येवुन महिलेची वीचारपुस केली असता ती खरच मनोरुग्ण असल्याचे कळाले तीच्या अंगावरचे कसेबसे कपडे डोक्यावर केसाच्या जटा झाल्या होत्या त्यात तीच्या डोक्यावर मोठि ईजा होन्याची शक्यता नाकारता येत नव्हती तीच्या डोक्यात एवढि घान झाली होती कि कात्री सुद्धा केस कापु शकत नव्हती पन सुमित यांनी प्रयत्न करुन तीचे केस कापुन स्वच्छ अंघोळ घालुन उपपोलीस निरीक्षक करेवाड मँडम यांनी आपल्या सहकारी त्याच्या घरी पाठवुन त्याना साडि सुध्दा दिली. दामीनी पथक क्र २ व माणुसकी ग्रुप च्या सहकार्याने घाटि दवाखान्यात नेले.तेथुन प्रथम उपचार घेवुन शेजल महिला आश्रम येथे पुनर्वसनासाठी अन्न वस्त्र नीवारा याकरीता ठेवन्यात आले.या सामाजिक कार्यात
पोलीस उप निरीक्षक स्नेहा करेवाड माणुसकी समुहाचे अध्यक्ष सुमित पंडित,देविदास पंडित पुजा पंडित,व महिला पोलीस नाईक आशा गायकवाड महिला पोलिस कॉन्स्टेबल लता जाधव,शेख मँडम,नीर्मला नींभोरे, सविता लोंढे महिला पोलिस कॉन्स्टेबल गिरिजा आंधळे आदिंनी सहकार्य केले.
*आपली संस्कृती च नाही आई-वडिलांना घरा बाहेर काढन —स्नेहा करेवाड*
अश्या केसेस हॅडल करणे सोपे नाही परंतु पोलीस आयुक्त नीखाल सर गुप्ता तसेच पोलीस उपायुक्त मीना मखवाना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कामगिरी बजावत आहोत.
घरामध्ये जर वाद वीवाद होत असतील तर कीमान त्यांना आपन कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवु शकतो एवढ तर किमान आपन करु शकतो.काय गुन्हा आहे हो त्यांचा त्यानी आपल्याला जन्म देवुन चुकी केली आहे का आपन त्यांना त्रास देतो तर
* पोलीस उप निरीक्षक स्नेहा करेवाड दामीनी पथक क्र २ औरंगाबाद*