शेंदुर्णी नगरीत श्री. संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने उद्या पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन.

देवेंद्र पाडळकर.(शेंदुर्णी)
दिनांक~१२/०२/२०२३

शेगांव येथील ब्रम्हांड नायक श्री. संत गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकटदिनाच्या निमित्ताने उद्या शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रम,पारायण, प्रवचन, पालखी मिरवणुक, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन श्री. संत गजानन महाराज चौकात करण्यात आले आहे.

यानिमित्ताने उद्या दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी श्री. संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता प्रतिमेची व पादुकांची शहरातुन सवाद्य पालखी मिरवणुक निघणार असुन तदनंतर महाआरती होईल. दुपारी ४ वाजता श्री. विजय ग्रंथाचे साखळी पारायण. संध्याकाळी ६ वाजता महाआरती झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्यात भाविकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन श्री. संत गजानन महाराज भक्त मंडळी शेंदुर्णी यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या