पाचोरा येथे गुर्जर समाजातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमीत्त दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१०/२०२२

पाचोरा परिसर गुर्जर समाजातील सर्व पोटजाती रेवे, लेवा, दोडे, सुर्यवंशी, बडगुजर, गुर्जर यासर्व समाज बांधवांची बैठक पाचोरा शहरातील पुनगावरोड वरील ध्येय करिअर अँकेडमीच्या दालनात संपन्न झाली, सदर बैठकीत समाजातील वरिष्ठ मान्यवर, युवावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. यावेळी गुर्जरसमाज भुषण लोहपुरुष सरदार वल्ताभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त गुर्जर समाजाच्या उन्नतीसाठी तसेच संघटन मजबूत करण्यासाठी विचारविनिमय करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


सबस्क्राईब करा व सत्यजित न्यूज कडून बक्षीस मिळवा.

यात पाचोरा परिसरातील समाजबांधवांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन स्पर्धकांनी आपला निबंध २५० शब्दात फुल स्क्वेफ कागदावर एका बाजुने लिहून दिनांक २९ ऑक्टोंबर २०२२ शनिवारी दुपारी १२ वाजेपावेतो हायटेक कॉम्पुटर किंवा शिव एम्पोरिम येथे जमा करावेत. यात प्रथम तिन विजयी स्पर्धकांना सदर निबंधाचे वाचन करावे लागणार आहे. तसेच दिनांक ३० ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता वर्ग केजी ते इयत्ता ०८ मधिल विद्यार्थी, विद्यार्थीनीसाठी “मोबा, टीव्ही याचे परिणाम” आणि वर्ग ०९ वी ते पदवी पर्यत विद्यार्थी, विद्यार्थीनीसाठी “माझे ध्येय त्यासाठी अपेक्षा” या विषयावर प्रत्येकी सात मिनीट असलेली वत्कृत्व स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.


सबस्क्राईब करा व सत्यजित न्यूज कडून बक्षीस मिळवा.

यास्पर्धेत विजयी स्पर्धकांचा बक्षिस समारंभ व सर्व कार्यक्रम दिनांक ३१ ऑक्टोंबर सोमवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता पाचोरा शहरातील ध्येय करिअर अँकेडमीतील स्वातंत्र्य सैनीक कै. आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन सभागृहात संपन्न होणार आहे. यामध्ये “मी माझा व्यवसाय व अनुभव” यावर देखील अनुभवी व्यक्ती मनोगत व्यक्त करणार आहेत तरी पाचोरा शहर व परिसरातील गुर्जर समाज तथा पोटजाती मधील सर्व बालके, युवावर्ग सह बंधुभगिनींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

ब्रेकिंग बातम्या