सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • गुटखा प्रकरणी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत, पाचोरा पोलीसांच्या हाती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.

  • पोलीस कारवाई होताच दोघे गुटखा किंगचा झाला समेट , एकाने पोलीस स्टेशनला जाऊन वाहनचालकाची घेतली भेट.

  • पोलीसांनी गुटखा पकडला मात्र गुटखा किंगवर ठोस कारवाई कधी ?

  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यास जाणाऱ्या २५ वर्षीय युवतीचा रेल्वेत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे दुर्दैवी मृत्यू.

पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यास जाणाऱ्या २५ वर्षीय युवतीचा रेल्वेत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे दुर्दैवी मृत्यू.

By Satyajeet News
July 22, 2022
471
0
Share:
Post Views: 71
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०७/२०२२

पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यास निघालेल्या कोटा (राजस्थान) येथील एका २५ वर्षीय युवतीचा बुरहानपुर ते भुसावळ रेल्वे स्थानकादरम्यान प्रकृती बिघडल्याने रेल्वे प्रशासनानाच्या हलगर्जीपणामुळे जळगाव च्या पुढे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोटा (राजस्थान) येथील रहिवाशी वाघिषा संजय फोतेदार (वय – २५) ह्या दि. २० जुलै रोजी सकाळी ८ वाजुन ३० मिनिटांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) रेल्वे स्थानकावरुन कर्नाटका संपर्क क्रांती एक्स्प्रेस ने (क्रमांक – १२६३०) डब्बा नंबर बी – ५ सिट क्रंमाक – १ वरुन पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी निघाली होती. दरम्यान एक्स्प्रेस ही भुसावळ स्थानकावर आल्यानंतर वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. वाघिषा हिला अस्वस्थ वाटु लागल्याने तिने तिच्या जवळ असलेली मेडिसिन घेतली.आणि परीवाराशी संपर्क केला असता मेडिकल सुविधा मिळावी म्हणून तीने एसी कोच च्या एडन्डट कडे मागितली असता भुसावळ स्थानकात एका डॉक्टरांनी तपासणी करुन काही औषधी दिली.

त्यानंतर वाघिषा चा प्रवास सुरू झाला मात्र रेल्वे एक्स्प्रेस मध्ये भुसावळ ते जळगाव दरम्यान कुठे तरी तिची ज्योत मालवली भुसावळ रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा येथे संपर्क करुन वाघिषा ला उतरविण्याच्या सुचना दिल्या मात्र पाचोरा स्थानकावर गाडी आली खरी मात्र तिला बोगितुन खाली उतरविण्याच्या आधीच तिची काहीच हालचाल होत नव्हते वाघिषा चा दि. २१ जुलै रोजी पहाटे ३ वाजुन ३० वाजता . घटनेची माहिती पाचोरा काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना कळताच सचिन सोमवंशी हे तात्काळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले. वाघिषा हिला लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा चे हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार, आर. पी. एफ. पाटील, रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशल हॉस्पिटल नेण्यात आले . मात्र वाघिषा हिची प्राणज्योत मालवली होती. सचिन सोमवंशी यांनी तात्काळ वाघिषा हिच्या परिवारास घटनेची माहिती कळविल्यानंतर वाघिषा हिचे वडिल, आई हे पुण्याहुन पाचोरा येथे दाखल झाले असता त्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास चाळीसगाव चे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.

दरम्यान जर रेल्वे विभागाच्या कमर्शियल विभागाने गांभीर्याने वाघिषाला भुसावळ येथे उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले असते तर कदाचित तिचा जीव वाचला असता असता. प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळेच तिचा मृत्यू झाल्याचे तिचे नातेवाईक आरोप करीत होते या घटनेत जर वातानुकूलित डब्यातील व्हीआयपी प्रवाशांची ही परिस्थिती तर सामान्य प्रवाशाचे काय असा प्रश्न उपस्थितीत होतो. वाघिषा च्या मृत्यूस जबाबदार अधिकारी यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली असून रेल्वे मंत्रालयाकडे याचा पाठपुरावा करण्यात येईल असे ते म्हणाले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या विजयाने पाचोर्‍यात ...

Next Article

लोहारा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरच उघड्यावर पशुहत्या व ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    सावखेडा येथील ४२ वर्षीय तरुण मजुराचा नदीपात्रात बुडून मृत्यू.

    June 2, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वनविभागाचे अधिकारी उंटावरून शेळ्या चारत असल्याने बिबट्या मस्तावला.

    July 18, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    सर्वसामान्य शिवसैनिकांपासुन ते लाॅकडाऊन आमदार पर्यंतचा राजकीय प्रवास – शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख.

    April 1, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली विकासकामांची शपथ राज्यातील पहिला आगळावेगळा उपक्रम.

    February 13, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    काळ आला होता पण, वेळ आली नव्हती, लासुरे येथील शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्यात यश, मात्र बैलाचा मृत्यू.

    September 29, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भ्रष्टाचारी तुपाशी तर आंदोलनकर्ते उपाशी. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड अभय पाटील यांचे बेमुदत ...

    August 19, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    नापिकीमुळे वाढलेला कर्जाचा बोजा सहन न झाल्याने परिस्थितीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.

  • Uncategorizedआपलं जळगाव

    समग्र शिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी जखमी अतिरिक्त पदाच्या कर्तव्यासाठी जातांना झाला अपघात.

  • क्राईम जगत

    तालुक्यातील सर्वच गावातील विद्यूतचोरांवर कारवाई व्हावी सुज्ञ नागरिकांची मागणी

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज