डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती जाहीर, अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०३/२०२२
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती जाहीर, अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे
आगामी १४ एप्रिल रोजी येणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त पाचोरा शहरातील नागसेन नगर भागात नुकतीच समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनामुळे सलग दोन वर्षे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सार्वजनिक जयंती मिरवणूक काढता न आल्याची व साजरी न करता आल्याची खंत व्यक्त करण्यात आली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्या कारणाने यावर्षी अतिशय भव्य व द्विगुणित उत्साहात सार्वजनिक जयंती उत्सव साजरा करण्याचे एकमताने ठरवण्यात आले आहे.
यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समिती नागसेन नगर व तसेच मिलिंद हौसिंग सोसायटी, संघमित्रा हौसिंग सोसायटी, जनता वसाहत, भीम नगर यांच्या एकमताने गठन करत अध्यक्षपदी प्रवीण ब्राह्मणे यांची निवड करण्यात आली. तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२२ ची कार्यकारणी सर्वानुमाते पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे यात
अध्यक्ष प्रवीण हरिश्चंद्र ब्राह्मणे, उपाध्यक्ष, आकाश नन्नवरे, अजय साळवे, दिपक खरे, शुभम खर्चाने, सचिव मिलिंद तायडे, सहसचिव अमोल कदम, खजिनदार, राजु सोनवणे, कार्याध्यक्ष भैय्या खेडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
तसेच या कार्यक्रमात सल्लागार मंडळ नेमून महत्वाची जबाबदारी टाकण्यात आली असून या सल्लागार मंडळात पृथ्वीराज लोंढे (माजी नगरसेवक), भावराव पवार (सेवा निवृत्त कृषी अधिकारी), अविनाश सावळे (माजी नगरसेवक), अविनाश भालेराव (माजी नगरसेवक), अनिल लोंढे, खंडु सोनावणे, रामचंद्र तांबे, यशवंत भिवसाने, भिमराव माने, किशोर बागुल, किरण सोनवणे, दिनेश पवार, अनिल जोगले, वाल्मीक गायकवाड यांचा समावेश असून मंडळातील सदस्य पुढीलप्रमाणे आहेत.
गौरव साठे, प्रावीण महिरे, विक्की जोगळे, अमोल पवार, अनुराग खेडकर, सागर खरे, आकाश भिवसने, विशाल मोरे, पवन खैरनार, मनोज नन्नवरे, आकाश खैरनार, मुन्ना खेडकर, विकास थोरात, मयुर ब्राह्मणे, लखन वाघ, किरण अहिरे, सुरज महिरे, आकाश बनसोडे, सागर वाघ व सिध्दार्थ मित्र मंडळ, नागसेन नगर पाचोरा, भिम नगर मित्र मंडळ पाचोरा, संघमित्रा हौसिंग सोसायटी मित्र मंडळ पाचोरा, मिलिंद हौसिंग सोसायटी मित्र मंडळ पाचोरा, जनता वसाहत मित्र मंडळ पाचोरा.