लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कठोर कायदे करा
कुडाळ
लव जिहादच्या विरोधात व धर्मांतर विरोधी कठोर कायदे करावेत, तसेच वक्फ बोर्डचा कायदा रहित करावा, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुडाळ येथे आंदोलन करण्यात आले.
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयासमोरील एस्.एन्. देसाई चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना रणरागिणी शाखेच्या कु. प्राची शिंत्रे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात महिलांना त्रास देणार्यांचा चौरंग्या केला जात होता; मात्र आज श्रद्धा वालकरची हत्या होऊन अद्याप आरोपीला शिक्षा झाली नाही. लव जिहादच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक हिंदु युवती आणि महिला यांचे बळी गेले आणखी किती हिंदू युवतींचे बळी जाऊ देणार आहोत का ? असा सवाल उपस्थित केला. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर, समितीचे श्री. राजेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक हर्षद खानविलकर आदी उपस्थित होते.
यावेळी हिंदूनो आपल्या तरुणी लव्ह जिहादला बळी पडू नये, यासाठी कटीबद्ध व्हा, धर्मरक्षण करा, युवतींनो लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकू नका, वक्फ कायदा रहित करा आदी घोषणा देत आणि याविषयीचे विविध फलक हातात धरुन जन प्रबोधन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अदिती तवटे हिने केले.