नुतन वर्षात मानवा असे घडेल का ? (प्रासंगिक लेख किंवा बातमी स्वरूपात)

प्रासंगिक.
नवे वर्ष नवे संकल्प
नव वर्षाच्या नव सुप्रभाती
नव जीवन गाणे गाऊ, सदाचारी, संस्कारी, शाकाहारी, राहूनच नवजीवन फुलवू!
२०२२या ख्रिस्त नववर्षाचे नव्या उल्हासाने प्रमुदित मनाने स्वागत करण्यासाठी मागे जे राहून गेले ते विसरून नववर्षाचे स्वागत करावे . यासाठी काही संकल्प करावे लागतील नुसते संकल्प करून चालणार नाही तर त्या नुसार एक दिशा ठरवावी लागेल. अन् तशी पाऊले उचलावी लागतील अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख व खान्देश जैन पत्रकार सतीश वसंतीलाल जैन (कुसुंबा) यांनी दिली.
🔹सदोदित कर्मशील राहा :- फळाचे अपेक्षा न करता कर्म केले पाहिजे. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले होते. जीवनात सत्कर्म करीत राहण्याचा संकल्प फार महत्वाचा आहे. देव ,शास्त्र,व गुरूचे स्मरण करून सत्कर्म केले पाहिजे.
🔷नेहमीच परोपकारी असावे :- वृक्ष सदोदित छाया देण्याचे कार्य करीत असतात, नदी सर्व प्राणीमात्रांना पाणी देते, वृक्ष फळे देऊन भुकेलेल्यांची भूक भागवतात. त्यांना कधीही भेदभाव नसतो. आपणही आपल्या मनात सेवाभाव अन् मदतीचा हात दिला पाहिजे . आत्मचिंतन करणे तेवढेच गरजेचे आहे. आपल्यातील गुण-अवगुण ओळखले पाहिजे, कोणालाही मानसिक किंवा शारीरिक दुखविले असेल तर त्याची क्षमा मागून प्रायश्चित्तही घेता येते.
🔹मनावर नियंत्रण ठेवणे :- माणसाचे मन हवेपेक्षाही वेगाने धावत असते परंतु मनावर ताबा असणे खूपच आवश्यक असते. मनावर ताबा, भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप सोपे होते. वाणीवर नियंत्रण असणे तेवढेच महत्त्वाचे असते.
🔹आत्मविश्वास , महत्वाकांक्षा असावी :- आजचे युग ओद्योगिकीकरण व भौतिकवादी आहे. यामध्ये पावलोपावली अडथळे येऊ शकतात. विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी डगमगून न जाता आत्मविश्वासाने त्या अडचणींचा, परिस्थितीचा धैर्याने सामना करणे जरूरी असते. आत्मविश्वास अन् धैर्याने तुम्ही सर्वांवर मात करून यशाचे शिखर गाठू शकता.आपल्या जिवनात महत्त्वाकांक्षेलाही खूपच मोठे स्थान आहे.
🔹नेहमीच चिरतरूण राहावे :- आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन असला तर कोणतीही गोष्ट साध्य होईलच असा विश्वास ठेवावा त्यामुळे आपले मन चिरतरूण राहते.
🔹विनम्रता ठेवणे :- विनम्रतेशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण असते. जीवनात सफल होण्यासाठी नम्र राहणे खूप गरजेचे असते. कठोरातील कठोर व्यक्ती विनयाने भावन्या शुन्य राहु शकत नाही. जो दूस-यांचा सन्मान निर्मल मनाने करतो, त्याचाच सन्मान होऊ शकतो असे म्हटले जाते.
🔹भूतकाळ दृष्टिसमोर ठेवणे :- यामध्ये भूतकाळातज्या गोष्टी घडल्या ,अनुभवल्या त्यातून धडा घेणे म्हणजे ती चूक पुन: होणार नाही याची काळजी घेणे होय. अनुभवातून शहाणपण यायलाच हवे. वर्तमानात वर्धमान होण्याची संधी यातून मिळते.
🔹देश ,धर्म,अन् संस्कृती या विषयी प्रेम जागृत ठेवणे :- प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की त्याने सर्वप्रथम देशाचा विचार करावा , देशविषयी प्रेम असावे आपल्या धर्माविषयी आस्था असावी अन् आपल्या संस्कृतीची जपणूक करावी. माणूसकीची जपणूक , समताभाव, नेहमी प्रयत्नशील राहावे.
🔹दुस-यांनाही आनंदी ठेवणे :- ‘आनंदी आनंद गढे जिकडे तिकडे चोहीकडे ‘ या ओळी सर्वांना माहित आहेत. आनंदी वातावरणामुळे मनुष्य अधिक कार्यक्षम राहू शकतो. त्यासाठी कुठे बाहेर जावे लागत नाही.
सरत्या किंवा गेलेल्या वर्षाच्या चांगल्या गोष्टींचा विचार करावा. आपल्या वर्तमानाला क्रियाशिल करण्याचा प्रयत्न करावा आणि भविष्याची सुखद जीवनाची कल्पना करावी.
सतिश वसंतीलाल जैन
खान्देश जैन समाजाचे प्रसिध्दी प्रमुख
कुसुंबा ता.जि.धुळे