दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०१/२०२३

पाचोरा तालुक्यातील वरखेडी हे मोठे बाजारपेठेचे गाव असून याच गावाच्या पुर्वेकडील भोकरी गावाजवळील डांभुर्णी रस्त्यावर श्री. महासर माता राइस मिल असून ही राइस मिल सुरु झाल्यापासून या राइस मिल बद्दल अनेक चर्चा अनेक किस्से व माहिती सर्वसामान्य जनतेतून ऐकायला मिळत आहेत.

(जादू मंत्र.)

पाचोरा तालुक्यात चालतोय भ्रष्टाचाराचा असाही जादू मंतर, रेशनिंगच्या तांदळाचे होते बासमतीत रुपांतर.

यातच भरीत भर म्हणून मागील काही दिवसांपासून या राइस मिलमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला असून याच घोटाळ्याच्या रकमेवरून या राइस मिलचा जबाबदार व्यक्ती व अपहार करणारा व्यक्ती यांच्यात खडाजंगी उडाली होती व याच भांडणातून एका व्यक्तीला जबरदस्त मारठोक झाली होती अशी चर्चा मागील काही दिवसापासून सुरू होती.

परंतु या घटनेबद्दल कुणालाही काहीही देणेघेणे नसल्याने हा विषय फक्त आणि फक्त चर्चेत होता. मात्र या विषयाने आता गंभीर वळण घेतले असून हे भांडण आता पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशन पर्यंत पोहोचले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हे भांडण होण्यामागचे कारण म्हणजे संबंधित व्यक्तीने या राईस मिलच्या व्यवहारात लाखो रुपयांचा घपला केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सविस्तर बातमी उद्या सकाळी

मागील बातमी

पाचोरा पुरवठा विभाग अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेत, स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ जात आहे काळ्याबाजरात.