ऊस तोडणीसाठी गेलेला पती परत न आल्याने, हतबल महिलेचा मुकादमावर संशय.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१२/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील ऊसतोडणीच्या कामासाठी मजूर म्हणून गेलेला पती अकरा महिने झाले तरी घरी परत न आल्यामुळे संबंधित महिला हतबल झाली असून माझ्या पतीचे ऊसतोडीसाठी घेऊन गेलेल्या मुकादमानेच काहीतरी बरेवाईट केले असावे असा संशय व्यक्त केला असून माझ्या पतीचा तपास करुन मला न्याय मिळावा यासाठी संबंधित महिलेने अगोदर पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर अर्ज दिला होता परंतु त्या अर्जाची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने संबंधित महिलेने जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक साहेब मा. श्री. एम. रामकुमार यांच्याकडे पोस्टाद्वारे निवेदन पाठवून माझ्या पतीला कामावर घेऊन गेलेल्या मुकादमाची चौकशी होऊन माझा पती परत आणण्यासाठी मदतीची मागणी केली आहे.
याबाबत पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा नंबर एक येथील सौ. सुमनबाई रमेश लोहार यांनी दिलेली माहिती अशी की रमेश लोहार व माझे पती रमेश चंद्रभान लोहार पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा नंबर एक येथील रहिवासी असून मोलमजुरी करून आमचा उदरनिर्वाह चालवत आहे. मोलमजुरी करतांना हाताला मिळेल ते काम मी व माझे पती करत होतो. असेच कामाच्या शोधात असतांनाच आमच्याच गावातील आमच्या ओळखीचा उसतोड मजुरांचा मुकादम (मुकडदम) हा १८ जानेवारी २०२२ रोजी आम्ही दोघे पती, पत्नी घरी बसलो असतांना आमच्या घरी आला व माझ्या पतीला म्हणाला की माझ्यासोबत ऊसतोडणीच्या कामाला चाल मी तुला चांगली मजुरी देईल असे सांगितले होते.
संतोष गोबरु चव्हाण यांनी असे सांगितल्यावर मी व माझ्या पतीने हाताला काम नसल्याने व घरसंसार चालतांना डोक्यावर थोडेफार कर्ज झाले असल्याने माझे पती उसतोड मुकादम संतोष चव्हाण यांच्या सोबत जाण्यासाठी तयार झाले व थोडाफार उचल घेऊन मला खर्चासाठी घरी पैसे देऊन दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी संतोष चव्हाण यांच्या सोबत उसतोडणीच्या कामासाठी निघून गेल्यानंतर अधुनमधून माझ्या पतीचा मला निरोप मिळत होता. त्यामुळे मी निश्चिंत होते व उसतोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर माझे पती घरी येतील या आशेवर मी गावातच मिळेल ते काम करुन घरखर्च चालवत होते.
असेच दिवसामागून दिवस निघून गेल्यावर ऊसतोडीसाठी गेलेले सर्व मजुर एप्रिल महिन्यात घरी परत येण्यास सुरुवात झाली होती. जुन महिन्यात काही मजुर परत आल्यावर मी संतोष चव्हाण याला माझे पती घरी केव्हा येतील याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की मागे राहिलेल्या मजुरांनसोबत येतील म्हणून मी वाट पहात राहिली परंतु जुन महिन्यात माझे पती घरी परत आले नाहीत. मी संतोष चव्हाण याला वारंवार विचारले की तो सांगायचा की मागे राहिला आहे नंतर येणार आहे. संतोष गोबरु चव्हाण हा ओळखीचा असल्याने मी त्याच्यावर भरवसा ठेवून माझे पती आज ना उद्या घरी येतील या आशेवर जगत होती व आजही जगत आहे.
परंतु जुन, जुलै महिना निघून गेला तरी माझे पती घरी न आल्यामुळे मी संतोष चव्हाण यांच्यामागे सतत तगादा लावला तेव्हा संतोष चव्हाण यांनी मला माझे पती या आठवड्यात थोडी थांब असे आश्वासन दिले तर कधी दमदाटी करून चुप बसवले मला मुलगा नसल्याने मी संतोष चव्हाण सांगेल ती गोष्ट ऐकून चुप बसत होती व ठरलेल्या बोली प्रमाणे माझ्या पतीला घरी लवकरात, लवकर आणुन देण्यासाठी संतोष चव्हाण यांना पाया पडून विनवण्या करत होती व आजही विनवण्या करत आहे.
परंतु आज १० डिसेंबर २०२२ पर्यंत माझे पती घरी आलेले नसून ते कुठे आहेत, कसे आहेत किंवा त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर बोलनेही होत नसल्याने तसेच संतोष चव्हाण हा योग्य माहिती देत नसून उलट मलाच दमदाटी करून मी तुझ्या नवऱ्याला मारुन टाकले आहे. तुझ्याकडून जे होईल ते करुन घे माझ्याजवळ भरपुर पैसा आहे मी पैसे भरून देईल मी कोणाचीही घाबरत नाही अशी धमकी देत असल्याने संतोष चव्हाण याने माझ्या पतीचे काहीतरी बरेवाईट केले असावे असा माझा संशय आहे. म्हणून माझ्या पतीला घरुन घेऊन जाणाऱ्या उसतोड मुकादमाची चौकशी होऊन माझ्या पतीला सुखरूप घरी आणून देण्यासाठी संतोष चव्हाण याला भाग पाडावे किंवा माझे पती कुठे आहेत याची चौकशी करून मला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख मा. श्री. एम. राजकुमार साहेब यांच्याकडे पोस्टाद्वारे निवेदन पाठवून केली असल्याचे सांगितले.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त सोमवार रोजी सत्यजित न्यूज कडून