जामनेर तालुक्याला चक्रीवादळ व पावसाचा तडाखा जिल्हाध्यक्षा सौ.वंदना चौधरी यांनी स्वतः बांधावर व गावात जाऊन केली पाहणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०९/२०२१
जामनेर तालुक्यात मागील चार दिवस पावसाने उग्र रुप धारण केले होते. जणूकाही ढगफुटीच झाली होती. या पावसामुळे जामनेर तालुक्यातील शेत शिवारात व गावपरिसात हातोहात, रातोरात होत्याचे नव्हते झाले. यावर्षी चांगला हंगाम हाती येईल असे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या बळीराज्याच्या काही क्षणातच स्वप्नांतला बंगला कोसळला.
यात ओझर, ओझर खुर्द, हिंगणे, लहासर, रामपूर, सामरोद या भागात चक्रीवादळ आणि पाऊसाने प्रचंड तडाखा दिला असल्याने प्रचंड नुकसान झाले, केळीच्या बागा, कपाशी, मका, तूर ही पीके पूर्ण आडवी झाली आहेत. घरावरची पत्रे उडून घरात प्रचंड पाऊस,पत्र उडाल्याने दगड घरात कोसळले, धान्य, घरातील संसारपयोगी सर्व सामान ओले होवून प्रचंड नुकसान झाले. सकाळी १० वाजेची वेळ असल्याने लोकानी कसातरी स्वतःचा जीव वाचवला पण गुरे – ढोरे यांचे प्रचंड नुकसान झाले. काही वाहून गेले आहे मोठी मोठी झाडे मुळासकट उखडली गेली.
निसर्गाच्या पावसाच्या पुरा सोबतच आसवांचा पूर वाहत होता. ही गंभीर परिस्थिती पाहून आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाण ठेवत राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सौ.वंदना ताई चौधरी यांनी पाऊसपाणी याची पर्वा न करता थेट पूरग्रस्त भागात जाऊन शेताच्या बांधावर व प्रत्यक्ष गावात घराघरात जाऊन शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देत अचानक आलेल्या आस्मानी संकटात झालेली नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असे आश्वासन यावेळी दिले.