शिंदे गटाकडून पुन्हा त्याच तिकीटावर तोच खेळ, गुवाहाटी जाण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान बुक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/११/२०२२
शिंदे गटांकडून पुन्हा त्याच तिकीटावर तोच खेळ खेळण्यासाठी नुकतेच एअर इंडियाचे विमान बुक केल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. मा. श्री. एकनाथ शिंदे हे ४० आमदारांना घेऊन प्रथम सुरतला गेले व नंतर त्यांनी या आमदारांना घेऊन थेट गुवाहाटी गाठली. त्यावेळी शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल’ या डायलॉगमुळे गुवाहाटी चर्चेत आली होती.
त्यानंतर राज्यात सत्तास्थापन केल्यावर मुख्यमंत्री मा. श. एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे सांगितले होते. म्हणून आता शिंदे आपल्या आमदार, खासदारांच्या कुटुंबियांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असून शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा निश्चित झाल्यानतंर आता यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान देखील बुक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यातील आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबिय अशा १८० जणांसाठी विशेष विमान बुक करण्यात आले असून २६ आणि २७ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या गुवाहाटी दौऱ्या दरम्यान आसामचे मुख्यमंत्री मा. श्री. हेमंत बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे सह शिंदे गटाचे जंगी स्वागत करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.