चिंचपुरे येथील सरपंच, उपसरपंचासह नऊ ग्रामपंचायत सदस्य अपात्र. बाळू पाटील यांच्या लढ्याला यश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०२/२०२३
पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह नऊ सदस्यांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले आहेत. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली असून अजूनही काही गावातून अश्याच प्रकारे तक्रारी दाखल झाल्या आहेत मात्र त्यांचा निकाल अद्यापपर्यंत येणे बाकी असल्याने बऱ्याचशा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील चिंचपुरा ग्रामपंचायत नऊ सदस्यांची असून सरपंच उपसरपंचांसह सर्वच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे अतिक्रमण असल्याबाबतची तक्रारदार बाळू भाऊराव पाटील (चिंचपुरे, ता. पाचोरा) यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दाखल करुन त्यांना अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी केली केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी मा. अभिजित राऊत यांनी आदेश काढत पाचोराचे गटविकास अधिकारी यांनी २८ जानेवारी २०२२ रोजी चिंचपुरा गावी येऊन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी केलेल्या अतिक्रमणाचे मोजमाप करुन तसा अहवाल मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. परंतु याच कालावधीत मा. जिल्हाधिकारी यांची नांदेडला बदली झाल्याने तो निकल प्रलंबित राहिला होता.
तदनंतर त्यांच्या जागेवर अमितजी मित्तल यांनी हजर झाल्यानंतर सदर प्रकरणी तक्रारदाराची तक्रार मान्य करत सरपंचासह सर्व सदस्य अपात्र घोषित केल्याचा निकाल घोषित केला.
यात सरपंच अक्काबाई हुसेन तडवी, उपसरपंच सचिन अनिल कोकाटे तर ग्रा. पं. सदस्य मंगलाबाई अनिल पाटील, ज्योतीबाई बेलदार, प्रदीप पवार, शरद पाटील, वैशाली आबा पाटील, गायत्री स्वप्निल देवरे, गणेश पवार हे ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ ज ३ अन्वये चौकशीअंती अपात्र घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.