श्री. संस्कार अनाथ मतिमंद मुलींच्या बालगृह व कार्यशाळा धुळे येथील मुलांनी बनवल्या आकर्षक वस्तू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१०/२०२२

धुळे येथील श्री. संस्कार अनाथ मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळेतील मुलींनी दिवाळीसाठी सुंदर आकर्षक विविध कलात्मक वस्तु तयार केल्या आहेत. या सर्व वस्तुंचा स्टॉल संस्थेत लावण्यात आला असुन आपल्याला सदर वस्तूंची घरपोच सेवा ही उपलब्ध आहे. या मुलिंचा बौद्धिक व सर्वांगिण विकास व्हावा या दृष्टिकोणातुन संस्था नेहमी प्रयत्नशील आहे.

आपण या वर्षाची दिवाळी एक प्रेरणादायी साजरी करूयात. आपण
कायम सामाजिक स्नेह जपण्याचा प्रयत्न करित असतात. या दृष्टिकोनातुन आपण आपल्या स्नेही व्यक्तिंना दिवाळी भेट देत असतो, परंतु यावेळी आपण अनाथ मतिमंद मुलींनी बनवलेल्या आकर्षक वस्तुंची भेट म्हणुन सर्वाना दिल्या तर या उपक्रमाला आपले प्रोत्साहन अनमोल ठरणार आहे व त्यांच्या चेहरयावरील आनंद द्विगुणीत होणार आहे.

म्हणून ज्यांना, ज्यांना या वस्तू खरेदी करायच्या असतील त्यांनी थेट स्टॉलला भेट देऊन किंवा खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा आपल्या खरेदीने या मतिमंद मुलींना एक प्रोत्साहन मिळेल हे मात्र नक्की.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
संपर्क-हिरल वाघ-९१६८७५४०३१
निखिल वाघ-७३०४१७७७०६
पत्ता-
बालाजी नगर, महेंद्र हॉटेल समोर, मन्साराम नगर शेजारी, साक्री रोड धुळे.

ब्रेकिंग बातम्या