पिंप्री (डांभुर्णी) जिल्हापरिषद शाळेला मा. उध्दव भाऊ मराठे यांच्याकडून साउंड सिस्टीम संच भेट.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/३०२३
माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. उध्दव भाऊ मराठे यांनी आपण या समाजाचे व गावाचे काही देणे लागतो अशा भावनेने त्यांच्या आई स्व. नर्मदाबाई दत्तात्रेय मराठे यांच्या स्मरणार्थ पाचोरा तालुक्यातील पिंप्री (डांभुर्णी) येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेला २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अकरा हजार रुपये किंमतीचा साउंड सिस्टीम संच भेट दिला आहे.
माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. उध्दव भाऊ मराठे यांचे मुळगाव पिंप्री हे असल्याकारणाने त्यांनी गावाचे ऋण फेडण्यासाठी व आपल्या गावातील शाळेत होणाऱ्या राष्ट्रीय, सांस्कृतिक तसेच शालेय कार्यक्रमात शोभा वाढावी व शालेय विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे नवनवीन अभ्यासक्रम ऐकण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून हा साउंड सिस्टीम संच भेट दिला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.