दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/११/२०२३

शेंदुर्णी ते अंबे वडगाव दरम्यान मालखेडा गावापासून थोड्याच अंतरावर राखीव जंगलाच्या हद्दीत आज रात्री दहा वाजेच्या सुमारास एक क्रुझर गाडी जळतांना आढळून आली आहे. ही गाडी पेटत असतांना या रस्त्यावरुन जाणाऱ्या, येणाऱ्या बऱ्याचशा वाहनधारकांनी घटनास्थळी थांबुन गाडीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले परंतु काहीएक फायदा न झाल्यामुळे त्यांनी काढता पाय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

तसेच ही क्रुझर गाडी जळतांना आसपासच्या परिसरात तसेच क्रुझर गाडीमध्ये कुणीही आढळून आले नसल्याने ही जळणारी क्रुझर गाडी याठिकाणी कुणी आणली होती किंवा काय असा प्रश्न निर्माण झाला असुन ही गाडी पेटविण्यात आली की अपघाताने पेटली असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त उद्या सकाळी