*मंत्री महोदय*
*आमच्याही यावे गावा*
*आमचा राम राम घ्यावा*
संतोष पाटील.
———————————————
बकाल झालेला गाव आणि परिसर गावापासून शहरा पर्यंत जोडलेला रस्ता,ढीम्म झालेलं प्रशासन अचानक पणे खडबडून जागं होतं तेव्हा असं समजायचं कुणीतरी मंत्री महोदय या रस्त्यावरून त्या गावाकडे जात आहे, एरवी त्या रस्त्याची, गावाची, परिसराची पार दुर्दशा झाली असते, कित्येक वेळा अर्ज फाटे करून कित्येक जण अपघातात मरून आंदोलने उपोषण करून रस्ते सुधारत नाहीत, मात्र एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर मंत्री महोदय त्या गावाला येत असतील तर गावाची पूर्णपणे दशाच बदलून जाते, तमाम महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न सुटलेला नाही शीव रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही शेतातून तयार झालेले पीक घरी आणता येत नाही अशी अवस्था असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की शेतकऱ्यांना विमानाने प्रवास करता यावा म्हणून, प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी हेलिपॅड तयार करणार, खरं म्हणजे हे विधान ऐकून तर मी निशब्द झालो, मूलभूत शाश्वत प्रश्न या लोकांना कळत नाही का? का मुद्दामहून असे प्रश्न नजर अंदाज करून नको त्या गोष्टी समोर आणून विषयाला भरकटत नेऊन लोकांना विचलित करण्याचा प्रयत्न चालू आहे, काहीच कळत नाही महाराष्ट्रातील सत्तेतले विरोधातले सगळेच नेते एकमेकांचे उणेदुणे काढण्यात व्यस्त आहेत, राज्याचं वैचारिक, पारमार्थिक, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, एकात्मिक सौख्य कशात आहे हेच या लोकांना कळत नाही, आपले दौरे आपला प्रशासकीय कार्यक्रम हा निव्वळ राजकीय हेतूने आखला जातो यामध्ये राष्ट्रहित किंवा राष्ट्र उभारणीसाठी काहीच करण्याचा प्रयत्न नसतो, ज्या पार्टीचे सरकार असते त्याच पार्टीच्या कार्यकर्त्यांना लोकांना झुकते माप देऊन त्यांचा विकास साधला जातो, इतर गोरगरीब जनता वाऱ्यावर सोडून हे सरकार निर्लज्जपणे राज्य करत आहे. सरकारी यंत्रणा ही जनतेच्या विकासासाठी व सोयीसाठी असते ही निव्वळ कल्पनाच आहे, एखाद्या गरीब दुबळ्या शेतकऱ्याचं गरिबाचं सरकारी कचेरी मध्ये काम पडतं तेव्हा त्या अधिकाऱ्याचा तोरा पाहण्यासारखा असतो, मात्र ज्यावेळेस एखादा मंत्री महोदय आपल्या दौऱ्यानिमित्त कार्यक्रमानिमित्त येतात तेव्हा प्रशासनाची तारेवरची कसरत आणि हुजूरीगिरी पाहण्यासारखे असते, असो ज्या ठिकाणी असे कार्यक्रम होतात त्या गावाचा परिसराचा तात्पुरता का होईना कायापालट होत असतो म्हणून मंत्री महोदय साहेब *आमच्याही यावे गावा रामराम आमचा घ्यावा..*
. ‌. ‌. संतोष पाटील
7666447112