मातोश्री आय सी यू अँड ट्रामा सेंटर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जळगावात शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२०
जळगाव —- येथील मातोश्री आय सी यू अँड ट्रामा सेंटर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जळगावात आज शुभारंभ करण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजु मामा भोळे, माजी आमदार मनीष बाबू जैन, डॉ. विरेन सुरेश खडके यांच्या संयुक्त विद्यमाने आज
मातोश्री आय सी यू अँड ट्रामा सेंटर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा जळगावात शुभारंभ करण्यात आला.यावेळी माजी पालक मंत्री आमदार गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , खासदार उन्मेश दादा पाटील, माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन, जैन एरिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू मामा भोळे, माजी पालक मंत्री आमदार संजय सावकारे, माजी आमदार मनीष जैन, आमदार चंदूभाई पटेल, महापौर ना.भारतीताई सोनवणे, उपमहापौर सुनिल खडके,यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी आमदार, महापौर, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचे सदस्य, आजी माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संघटना संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.